आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: नशेत तर्र तरुणीने पोलिसांसमोरच काढले कपडे, वॉचमनने सिगारेट आणली नाही याचा होता राग, तासभर घातला धिंगाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ओशिवारा येथील एका इमारतींमध्ये नशेत तर्र असलेल्या एका तरुणीने तासभर धिंगाणा घातला. तिचा बिल्डिंगच्या वॉचमनसोबत वाद झाला होता. प्रकरण इतके चिघळले की घटनास्थळी पोलिसांना बोलवावे लागले. तरीही ती तरुणी ऐकण्यास तयार नव्हती. तिला पोलिस स्टेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी या तरुणीने आपल्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. पोलिसांसमोर तरुणीचा असला हायव्होल्टेज ड्रामा पाहून सगळेच हैराण झाले.


सिगारेट नाही आणल्याचा होता राग
प्रत्यक्षात ही घटना 25 ऑक्टोबरची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एका इमारतीमध्ये नशेत तर्र असलेली तरुणी धिंगाणा घालत असल्याची तक्रार मिळाली होती. तिने एका वॉचमनकडून सिगारेट मागवली होती. परंतु, वॉचमनने तिचे काम ऐकले नाही. याच गोष्टीचा तरुणीला इतका राग आला की तिने राडा घातला. शेजाऱ्यांना आणि वॉचमनला परिस्थिती हाताळणे कठिण झाल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले होते. पोलिस तिला चौकशीसाठी घेऊन जात होते, त्यावेळी तरुणी आणखी भडकली. तिने आपल्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. शेजारीच थांबलेल्या लोकांनी तिचा हा कारनामा आपल्या मोबाईलमध्ये टिपला. या व्हिडिओमध्ये ती वॉचमनला मारण्याचा प्रयत्न करताना देखील दिसून येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...