आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI : डिस्‍काऊंट न मिळाल्‍याने तरूणींचा मद्यधूंद अवस्‍थेत धिंगाणा, अश्‍लील शिव्‍यांचा केला भडीमार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कल्‍याणमध्‍ये दोन तरूणींनी मध्‍यरात्री रेल्‍वे स्‍टेशनवर जोरदार धिंगाणा घातला. यावेळी दोघीही दारूच्‍या नशेत तर्र होत्‍या. जवळपास तासभर त्‍यांनी धिंगाणा घातला. मात्र यादरम्‍यान त्‍यांना कोणीही रोखले नाही. त्‍यांनी एका फेरीवाल्‍याचे सामानही फेकून दिले. तेथे उपस्थित असलेल्‍या एका व्‍यक्‍तीने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि तो ट्विटरद्वारे पोलिसांना पाठवला. आता पोलिस त्‍या तरूणींचा शोध घेत आहेत.

 

23 सप्‍टेंबर, रविवार रात्रीची ही घटना आहे. तेथे उपस्थित लोकांनी सांगितले की, दोन्‍ही तरूणी फेरीवाल्‍याकडून काही सामान खरेदी करण्‍यासाठी आल्‍या होत्‍या. खरेदीत डिस्‍काऊंट देण्‍याची मागणी त्‍यांनी केली. मात्र फेरीवाल्‍याने याला नकार दिला. यामुळे तरूणी भडकल्‍या व त्‍यांनी फेरीवाल्‍याला अतिशय अर्वाच्‍य भाषेत शिव्‍या देण्‍यास सुरूवात केली. नंतर त्‍यांनी त्‍याचे काही सामानही फेकून दिले. लोकांनी सांगितले की, तरूणी नशेत एवढ्या धुंद होत्‍या की, त्‍यांना नीट उभेही राहता येत नव्‍हते.

 

 

 


 

 

बातम्या आणखी आहेत...