आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिऊन महिलेने केला विमानात गोंधळ, मागितली अजुन दारू, नकार दिला म्हणुन दिल्या शिव्या.....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- मुंबई वरून लंडनला जाणाऱ्या विमानातील पॅसेंजर आणि क्रु मेंबरला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. विमानातील बिझनेस क्लास मधल्या एका महिलेने दारू पिऊन गोंधळ सुरू केला, त्यानंतर तिने क्रु मेंबरला अजून दारू देण्यास सांगितले. पण क्रु मेंबरने नकार दिल्यामुळे तिने त्यांना शिव्या देणे सुरू केले. रिपोर्टनुसार तिने एका क्रु मेंबरला गालात चापट पण मारली. 

 

लंडनच्या हीथ्रो एअरपोर्टवर विमान लँड झाल्यावर त्या महिलेला अटक करण्यात आले. ही पुर्ण घटना एअर इंडिया फ्लाइट एआई- 131 मध्ये 10 नोव्हेंबरला घडली. एका कॅबिन क्रु मेंबरने घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सोशस मिडियावर व्हायरल होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...