आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आत्याच्या पतीच्या प्रार्थना सभेत गैरहजर होती करीना, दुस-या दिवशी दिसली पब बाहेर, नीट चालताही येत नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान बुधवारी उशीरा रात्री मुंबईतील एका पबबाहेर दिसली. यावेळी तिला नीट चालताही येत नव्हते. तिला बघून ती दारुच्या नशेत असल्याचे दिसून आले. यावेळी करीनाने मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले, सोबतच फोटोग्राफर्सना पोजही दिली नाही. अलीकडेच करीनाची आत्याचे पती राजन नंदा यांचे निधन झाले. करीना त्यांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होती. शिवाय मंगळवारी दिल्लीत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेलाही करीना अनुपस्थित होती.


- करीनाच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाल्यास, तिचा याचवर्षी 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट रिलीज झाला होता, तो सुपरहिट ठरला होता. आता करीना अक्षय कुमारसोबत आता 'गुड न्यूज'मध्ये झळकणार आहे. चित्रपटात दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. हा चित्रपट 19 जुलै, 2019 रोजी रिलीज होणार आहे. शिवाय मंगळवारी रात्री  'तख्त' या आगामी चित्रपटाचीही घोषणा झाली. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये करीनासोबत अनिल कपूर, रणवीर सिंह, आलिया भट, विक्की कौशल, भूमि पेडणेकर आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...