Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | drunk man beaten in solapur

मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या जावयाला सासरच्या लोकांची मारहाण

प्रतिनिधी | Update - Sep 02, 2018, 12:30 PM IST

सासरवाडीच्या लोकांनी मारहाण केल्याप्रकरणी जावयाच्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरूध्द तर जावयाने मद्य प्राशन करून सासुर

  • drunk man beaten in solapur

    तुळजापूर - सासरवाडीच्या लोकांनी मारहाण केल्याप्रकरणी जावयाच्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरूध्द तर जावयाने मद्य प्राशन करून सासुरवाडीत धिंगाणा घातल्याप्रकरणी जावयाविरोधात तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी ६ च्या सुमारास शहरातील वेताळनगर येथे शुकूर गफुर पठाण (रा. वेताळ नगर) सासरवाडी येथे गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीस घराकडे चल असे म्हणताच मैन्नुदीन मज्जीद शेख, मज्जीद मुशब शेख व रुक्साना मज्जीद शेख (सर्व रा.वेताळ नगर) यांनी जावयास तू कांही काम धंदा करीत नाहीस, आम्ही तुझ्या पत्नीस तुझ्या सोबत पाठवित नाही, असे म्हणत जावई शुकूर गफुर पठाण याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ढकलून देऊन जखमी केले. याप्रकरणी जावई शुकूर गफुर पठाण यांच्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात सासरवाडीच्या मंडळीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तर याच प्रकरणी जावयाने मद्यप्राशन करून सासरवाडीत धिंगाणा घातल्याच्या फिर्यादीवरून जावई शुकूर गफूर पठाण याच्याविरोधात मैन्नुदीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending