Home | International | Other Country | Drunk man testing wifes love gets knocked by van standing on middle of street

पत्नीच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी पतीने उचलले इतके घातक पाऊल, दुसऱ्याच क्षणी झाला पश्चाताप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 05:43 PM IST

पतीने नशेत असताना केला हा स्टंट

  • Drunk man testing wifes love gets knocked by van standing on middle of street
    इंटरनॅशनल डेस्क - दारुच्या नशेत एखादी व्यक्ती किती इमोशनल होते ते सांगायला नको. तेच चीनबद्दल बोलल्यास गोष्टच न्यारी... चीनमध्ये एका व्यक्तीने नशेत तर्र असताना आपल्या पत्नीच्या प्रेमाची फिल्मी स्टाइल परीक्षा घेण्याचे ठरवले. पॅन असे त्याचे नाव असून त्याने पत्नी झो हिच्यावर प्रेम व्यक्त केला. यानंतर तू देखील प्रेम सिद्ध कर असे म्हणत एकाच गोष्टीवर अडून बसला. दोघांमध्ये वाद झाला आणि पती घर सोडून आणखी दारु पिण्यासाठी निघून गेला. ड्रिंक केल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला फोन लावला. यानंतर पुन्हा तेच... दोघांचा वाद इतका वाढला की पती नशेत तर्र अवस्थेत रस्त्यावर आला. पत्नीने आपल्याला हटवून जीव वाचवला तर ती आपली... अन्यथा ती चीटिंग करते हे सिद्ध होईल असे त्याने ठरवले. यानंतर जे घडले ते या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.

Trending