Home | National | Other State | drunk soldier breaks wife arm and shoulder after quarrel while on holiday in Punjab

Shocking: सुटीवर घरी आलेल्या जवानाने पत्नीचे केले असे हाल, एका हातासह खांदा मोडला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 13, 2019, 12:43 PM IST

आरोपी नशेत झोपी गेल्याने वाचली पत्नी

  • भटिंडा - पतीच्या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ आपले मन विचलित करू शकतात. ही घटना पंजाबच्या भटिंडा येथे घडली आहे. यात दिसणारी महिला भारतीय जवानाची पत्नी आहे. तिचा पती नुकताच सुटीवरून घरी परतला होता. यानंतर त्याने पत्नीचे जे हाल केले तेच आता समोर आले आहेत. मारहाण इतकी बेदम करण्यात आली की पीडित महिलेचा एक हात आणि खांदा देखील मोडला आहे. चेहऱ्यावर इतक्या जखमा की तिला नीट बोलता देखील येत नाही. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


    आरोपीला झोप लागल्याने वाचली पत्नी
    - गंभीर जखमी अवस्थेत महिलेला येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातच तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार, तिचा पती भारतीय लष्करात जवान आहे. सुटी घेऊन घरी आला तेव्हा तो नशेत होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाद घातला. यानंतर तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला लाठीने अमानुष मारहाण करण्यात आली. यात तिच्या एका हाताचे आणि एका खांद्याचे हाड मोडले आहेत.
    - मद्यधुंद अवस्थेत आरोपीने आपल्या पत्नीला लाठ्या-काठ्यांनी रात्रभर मारहाण केली. याच दरम्यान नशेत त्याला झोप लागली. तो झोपला नसता तर त्याने मारहाण करूनच पत्नीचा जीव घेतला असता. दरम्यान, पोलिसांनी पीडितेच्या पालकांना रुग्णालयात बोलावून यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 11 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मुलीचा विवाह सैनिकासोबत लावून दिला होता. तेव्हापासूनच तो हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत होता. याच कारणावरून त्या रात्री सुद्धा दोघांमध्ये भांडण झाले आणि पतीने पत्नीचे असे हाल केले असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.

  • drunk soldier breaks wife arm and shoulder after quarrel while on holiday in Punjab

Trending