आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - ओला टॅक्सीने गुरुवारी मध्यरात्री आपल्या घरी परतत असलेल्या तरुणीचे शेजारी बसलेल्या युवकाने नकली पिस्तुलाच्या जोरावर जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीने धाडस दाखवत त्या युवकाची जीभच दाताने तोडली आणि स्वत:चा जीव वाचवला. कापलेल्या जिभेवर उपचार करण्यासाठी तो आणि टॅक्सीचालक एसएमएस रुग्णालयात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. तो युवक त्या टॅक्सीचालकाचा मित्र आहे. पोलिसांनी सांगितले की, ती २१ वर्षांची तरुणी बीबीएची विद्यार्थिनी आहे.
ती मूळची आग्रा येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री ती आश्रम मार्गावरील जी-क्लब येथे एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. तेथून घरी परतण्यासाठी तिने ओला टॅक्सी बूक केली होती. टॅक्सी आली तेव्हा त्यात चालकाशिवाय एक युवकही होता. तरुणीने विचारणा केल्यानंतर चालकाने तो त्याचा मित्र असल्याचे सांगितले. नंतर त्या मित्राने नकली पिस्तुलचा धाक दाखवत तरुणीशी अश्लील चाळे सुरू केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.