आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामावर कार्यरत असताना मद्यपान करून पाेलिसाने घातला धिंगाणा, वरीष्ठांनी केली कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - कामावर कार्यरत असताना मद्यपान करून आलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याने मंगळवारी शहर पाेलिस ठाण्यात धिंगाणा घातला. या पाेलिसाविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
देवपूर पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेले पाेलिस नाईक दिलीप ताेताराम पवार हे मंगळवारी रात्री शहर पाेलिस ठाण्यातील लाॅकअप गार्ड ड्यूटीवर कार्यरत हाेते. शासकीय कामावर असताना त्यांनी मद्यपान केले हाेते. हा प्रकार तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. रात्री दाेन वाजेच्या सुमारास त्याने मद्याच्या नशेत पाेलिस लाॅकअपजवळ व पाेलिस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घातला. याप्रकरणी सहायक फाैजदार माेहन शिवदास मंडले यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलीप पवार याच्याविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात दारूबंदी कायदा कलम ८५(१) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेडकाॅन्स्टेबल एम.एस.बडगुजर करीत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...