आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमजोरी आणि नपुंसकतेची समस्या नष्ट करते खारीक, हिवाळ्यात अवश्य ट्राय करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते, कारण हे फळ वाळलेल्या स्वरुपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते. थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.

 

- बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर( १२५ मिलीग्रॅम) आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून घ्या. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.


- खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि २५० मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करा. याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर राहतील.


- खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होईल. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसर्‍या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसर्‍या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून 12 व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्या दूर होईल.


- भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...