आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंची सून तन्वी यांना अटकपूर्व जामीन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे | ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात डीएसके यांची सून तन्वी शिरीष कुलकर्णी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तपास अधिकारी पाचारण करतील त्यावेळी हजर राहणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडायचा नाही, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करायचा, साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही,' या अटींवर सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी जामीन दिला आहे. तन्वी यांनी अॅड. श्रीकांत शिवदे आणि अॅड. चिन्मय इनामदार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांना अटक करण्यात आली असून तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. मागील आठवड्यात डीएसके आणि हेमंती यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. शिरीष यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. पुतणी सई वांजपे आणि अश्विनी देशपांडे यांनी अॅड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून निर्णय होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...