Gadget / आपल्या स्मार्टफोनला असा देऊ शकता डीएसएलआर टच

ट्रायपॉडच्या मदतीने काढलेली छायाचित्रे स्मार्टफोनला डीएसएलआरच्या जवळ आणतात
 

दिव्य मराठी

Aug 17,2019 04:21:00 PM IST

लेन्स अॅटॅच करा
स्मार्टफोनद्वारे कॅमेरा अॅडव्हेंचर करायचे असेल तर फोनच्या कॅमेऱ्यावर लेन्स लावू शकता. क्लिप ऑन लेन्स सर्व स्मार्टफोन कॅमेऱ्यावर लावता येतात. ते अनेक प्रकारचे असतात.सेटिंग बदला
आपण आपल्या स्मार्टफोन सेटिंगला ऑटोमॅटिक मोडवर राहू देता. एक प्रयत्न मॅन्युअल सेटिंग्जच्या जगात प्रवेशाचाही करावा. सेटिंग्ज बदलण्यास घाबरू नका आणि छायाचित्रांचा परिणाम सारखा तपासत राहा.


नवे अॅप ट्राय करा
कॅमेरा अॅप छायाचित्रांना व्यावसायिक टच देतात. आपल्या गरजेनुसार फिल्टरच्या आधारे त्यांची निवड करतात. एकाच अॅपवर विसंबण्याऐवजी नवा शोध सुरू ठेवा.

फ्लॅशपासून मुक्ती
स्मार्टफोन कॅमेऱ्याचा सर्वात कमजोर भाग म्हणजे फ्लॅश. त्यामुळे फोटो बिघडतात. चांगली लाइटिंग करा. खिडक्यांचे पडदे हटवा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा.

ट्रायपॉडचा वापर करा
अनेक ट्रायपॉड ब्लू टूथसह येतात. ट्रायपॉडच्या मदतीने काढलेली छायाचित्रे स्मार्टफोनला डीएसएलआरच्या जवळ आणतात.

X