आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवढे चॅनल बघायचे तितकेच माेजा पैसे; ट्रायचा अादेश: DTH, केबलसाठी यापुढे महिन्याला 130 रुपये स्थिर अाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नाशिक - टीव्हीवर यापुढे जेवढे चॅनल पाहायचे असतील, तितकेच पैसे ग्राहकांना महिन्याकाठी माेजावे लागणार अाहेत. १ जानेवारी २०१९ पासून ही याेजना ग्राहकांसाठी देशभरात उपलब्ध हाेणार अाहे. टेलिकाॅम रेग्युलेरिटी अॅथाॅरिटी अाॅफ इंडिया (ट्राय) कडून 'डायरेक्ट टू हाेम' सेवा देणाऱ्या कंपन्या किंवा केबल नेटवर्कचालकांवर यासाठी नवे नियंत्रण अाणले अाहे. यामुळे अाता ग्राहकाला दरमहा १३० रुपये स्थिर अाकार माेजावा लागणार असून, त्यात माेफत असलेले शंभर चॅनल ग्राहकांना मिळतील.

 

तर, प्रत्येक चॅनलला अापल्या लाेगाेखाली ताे माेफत अाहे किंवा काय, दरमहा त्याचे शुल्क किती, हेदेखील दर्शवावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकाने निवडलेल्या चॅनलचेच भाडे त्याला माेजावे लागणार अाहे.डीटीएच कंपन्यांकडून चॅनलचे जे पॅकेज दिले जाते, त्यात शंभरावर चॅनल्स हे माेफत अाहेत. मात्र, त्यांचाही समावेश या पॅकेजेसमध्ये केला जातो. अनेक चॅनल कधीही घरातील कुणीही पहात नाही, मात्र त्यांचेही भाडे सद्यस्थितीत ग्राहकाला भरावे लागते. या चॅनल्सपोटी ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडू नये, तसेच जेवढे चॅनल पाहायचे अाहेत त्याच चॅनल्ससाठी शुल्क देता यावे यासाठी १ डिसेंबरपासून चॅनल्सबाबतची ग्राहकांची मागणी मागविली जाईल अाणि प्रत्यक्षात १ जानेवारी २०१९ पासून त्यानुसार अंमलबजावणी हाेईल. 

 

याशिवाय काेणतेही नवे कनेक्शन घेताना इन्स्टाॅलेशन शुल्क ३५० रुपयांपेक्षा जास्त अाणि अॅक्टिव्हेशन शुल्क १०० रुपयांपेक्षा अधिक घेता येणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेत 'ट्राय'ने हा निर्णय घेतला असून, यामुळे केबलचालक अाणि डीटीएच अाॅपरेटर्सच्या मनमानीला चांगलाच पायबंद बसणार असल्याची माहिती ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता यांनी दिली. सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात ग्राहक जागृती उपक्रमात ते मार्गदर्शन करत हाेते. बंगळुरू प्रादेशिक कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी एस. एस. गलगले, के. मुरलीधर यांची प्रमुख उपस्थिती हाेते. 

 

अॅपद्वारे ट्रायला द्या डाऊनलाेडिंगची माहिती : 'माय स्पीड' हे ट्रायचा अॅप डाऊनलाेड केल्यास माेबाइल ग्राहकाला त्याच्या जागेवरील डाऊनलाेडिंगचा वेग किती मिळाला, याची माहिती ट्रायला मिळते. जेथे हा वेग कमी असेल तेथे त्या माेबाइल कंपनीने चांगले नेटवर्क द्यावे, यासाठी सूचना केल्या जातात. अशीच मदत माेबाइल काॅल्सच्या माध्यमातून मिळते. व्हाइस काॅलच्या गुणवत्तेबाबत रेटींग कळवून याचप्रकारे ट्रायला माहिती दिली जावू शकते, याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले. 

 

नेटवर्क, डीटीएच कंपन्यांच्या मनमानीवर ग्राहकांकडून तक्रारी : भरगच्च भरलेल्या सभागृहातून विविध माेबाइल अाणि डीटीएच कंपन्यांच्या ग्राहकांनी ट्रायसमाेर तक्रारी मांडल्या. यात नेटवर्क न मिळणे, ट्रायवरच नियंत्रकाची नेमणूक करणे, ग्राहकांच्या तक्रारी कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी लवादाची नेमणूक करणे, कालमर्यादेत तक्रारी न साेडविणाऱ्यांवर दंडात्मक कारवार्इ करावी अशा मागण्या यावेळी करण्यात अाल्या. ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी जाहीरपणे विविध माेबाइल कंपन्यांची पाेलखाेल केली. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित हाेते. 

 

माेबाईल पोर्टेबिलिटी हाेणार अधिक सुलभ 
मोबाइल पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना वारंवार मोबाइल कंपनीच्या दालनात चकरा माराव्या लागतात, मात्र अाता कंपन्यांना पाेर्टेबिलिटीचा अर्ज करणाऱ्या ग्राहकाला त्याचवेळी त्याचेकडे शिल्लक असलेले बिल किंवा इतर मागण्या यांची माहीती द्यावी लागणार असल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले


'ट्राय'चे सचिव गुप्ता 
१ जानेवारीपासून योजनेची अंमलबजावणी अशी सुरू अाहे लूट 
> केबल किंवा डीटूएच सेवा घेताना माेजावे लागते मनमानी शुल्क. 
> इच्छा नसताना पॅकेजेस‌मध्ये अनेक टीव्ही चॅनल्स. 

मासिक भाडे वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने अाकारले जाते. 
अचानक चॅनलचे प्रदर्शन बंद करणे, त्या जागी ग्राहकाला न विचारता दुसरे चॅनल पॅकेजमध्ये देणे. 


ट्राय'ने घातले हे बंधन 
केबल, डीटूएच अॅक्टिव्हेशनकरिता १०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क अाकारता येणार नाही. इन्स्टाॅलेशन शुल्क ३५० रुपयांपेक्षा जास्त घेता येणार नाही. मासिक १३० रुपयांचा स्थिर अाकार असेल ज्यात १०० माेफत असलेले चॅनल्स ग्राहकांना मिळतील. प्रत्येक चॅनलच्या निवडीनुसार त्याचे जितके दर असतील तितकेच माेजावे लागतील. प्रत्येक चॅनलला त्यांचे मासिक दर, चॅनल माेफत अाहे का? हे लाेगाेच्या खाली प्रदर्शित करावे लागेल. सेवा प्रदात्याने सेटअाॅफ बाॅक्सला एक वर्षाची वाॅरंटी द्यावी लागेल, पुढील दाेन वर्षे शुल्क घेऊन वाॅरंटी देता येईल. टाटा स्कायने काही चॅनल्स अचानक दाखविणे बंद केल्याची गंभीर दखल घेत ग्राहकांना भरपाई किंवा डिस्काउंट देणे गरजेचे असल्याचे ट्रायने म्हटले अाहे

बातम्या आणखी आहेत...