आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेकऑफदरम्यान एअरपोर्टच्या भिंतीला धडकले दुबईला जाणारे एअर इंडियाचे विमान, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, 136 प्रवासी सुखरुप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - एअर इंडियाचे एक विमान गुरुवारी रात्री टेकऑफ दरम्यान तमिळनाडूच्या त्रिची एअरपोर्टवर एअर ट्राफिक कंट्रोलच्या भिंतीला धडकले. बोइंग बी737-800 हे विमान दुबईला जात होते. त्यावेळी विमानामध्ये 136 प्रवासी होते. घटनेनंतर विमानाची पहाटे 5.30 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी एअरपोर्टवर सकाळी 5.30 वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानाचे फारसे नुकसान झालेले नसून ते उड्डाण करण्यास सक्षम असल्याचे तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

 
एअर इंडियाने सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे स्पष्ट केले आहे. घटनेची माहिती डीजीसीएला देण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत पायलट आणि को-पायलटना ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. मुंबई सुरक्षित लँडिंगनंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानामध्ये दुबईला पाठवण्यात आले. ही घटना विमानाला पक्षी धडकल्यामुळे घडली असावी अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विमानाची चाके एटीसी कंपाऊंडच्या भिंत आणि अँटिनाला धडकली होती. 

Trichy- Dubai Air India flight with 136 passengers on board hit the ATC compound wall at Trichy Airport yesterday and was diverted to Mumbai. The flight had got damaged under the belly, was declared fit for operations after inspection at Mumbai Airport. pic.twitter.com/8cczII46Mp

— ANI (@ANI) October 12, 2018

 

बातम्या आणखी आहेत...