आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयर्लंडच्या डब्लिनमधील शाळेत विद्यार्थी परिषदेच्या प्रस्तावानंतर ड्रेस जेंडरची ओळख पटू नये म्हणून मुलांना मिळाले स्कर्ट घालण्याचे स्वातंत्र्य 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्लिन - आयर्लंडच्या डब्लिन शहरातील एका शाळेत विद्यार्थ्यांाच्या मागणीवरून मुलांनाही स्कर्ट घालून शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली. शाळेची जेंडर न्यूट्रल पॉलिस अमलात येण्यासाठी असे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यापासून शाळेत हा नियम लागू होईल. शाळेतील स्वच्छतागृहाबाहेर असलेले मुले आणि मुलींचे साइन बोर्डही काढून टाकण्यात येणार आहेत. स्त्री-पुरुष समानता  या मूल्यांची अमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुलां-मुलीमधील भेदभाव दूर होण्यास मदत होईल.आयर्लंडमधील साऊथ डब्लिनच्या विकलॉ शहरात सेंट ब्रिगिडस नॅशनल स्क्ूल आहे. येथील विद्यार्थी परिषदेच्या मुलांनी हा प्रस्ताव दिला होता.  त्यास व्यवस्थापनाने मान्यता दिली. आता नव्या नियमानुसार  मुलांनाही स्कर्ट वापरता येणार आहे, असे सांगण्यात आले. 


मुलांना लैंगिकतेवरून स्वत:ची ओळख पटवत नाहीत तोपर्यंत अडचण नको
सेंट ब्रिगिड्स नॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपॉल मायरे कोस्टेलो यांनी सांगितले, काही मुले लहान वयात असमंजस असतात. शिकत असताना मुलांना लैंगिकतेवरून आपली जोपर्यंत स्वत:ची ओळख बनवत नाहीत आणि त्यांना वाईट अनुभव येऊ नयेत  यासाठी मुलांनी कोणतेही कपडे वापरावेत पण त्यात त्यांना संकोच वाटू नये, त्यांना आनंद मिळावा, हाच उद्देश आहे. मुख्याध्यापकांचे म्हणणे असे की याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 


2017 मध्ये जून महिन्यात उकाड्याने त्रस्त झाल्याने स्कर्ट घालून 30 मुले आली शाळेत
२०१७ मध्ये जून महिन्यात इंग्लंडमधील डेव्हन शहरातील टिस्का अकादमीत ३० मुले स्कर्ट घालून आली होती. कारण या महिन्यात तेथे खूप धग जाणवत होती. १९७६ नंतर प्रथमच हवामान तापले होते. त्यामुळेच मुलांनी मुलींप्रमाणे स्कर्ट घालणे पसंत केले. मुलांनी आधी शाळेकडे परवानगी मागितली होती. पण शाळेने मागणी फेटाळून लावली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली होती.

बातम्या आणखी आहेत...