आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी पर्यटनामुळे 'सुला'मध्ये अाठवड्याला सात हजार पर्यटक; हाॅटेल, वाहतूक व्यवसायाला तेजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उपक्रम सुरू केले. या कृषी पर्यटनाचा लाभ सुला विनियार्डच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक, बेरोजगार तरुण आणि तरुणींना मिळाला आहे. द्राक्षापासून तयार होणारी वाइन निर्मिती पाहण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी भेट देत असल्याने सुला आता एक पर्यटनस्थळ होत आहे. त्यामुळे केवळ द्राक्ष उत्पादकांचाच नव्हे तर नाशिक शहरातील आर्थिक उलाढालदेखील वाढली असल्याचे 'सुला'चे उपाध्यक्ष मोनित ढवळे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


नाशिक शहरातून तब्बल २५ देशांना वाइन निर्यात करून सुला विनियार्डने जागतिक ठसा उमटविला आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ राज्यातीलच नव्हे तर, परराज्यासह परदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येतात. एका आठवड्याला साधारणत: ६ ते ७ हजार पर्यटक भेट देत असून या माध्यमातून नाशिक शहरातील हाॅटेल, वाहतूक यांच्या व्यवसायाला तेजी निर्माण झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा विषय राष्ट्रीयस्तरावर गंभीर विषय बनला असून, महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुलामध्ये महिला पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी जुलै २०१८ पासून विनियार्डमध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ठेवण्यात आले अाहे. या गंगापूर निर्णयामुळे पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित बनले असून दुसरीकडे गैरप्रवृत्तीच्या व्यक्तींना यामुळे आळा घालण्यातही यश आल्याचे मोनित ढवळे यांनी सांगितले. 


वाइन निर्मिती पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना गुणवत्तापूर्ण पर्यटकांवर लक्ष केंद्रित केले असल्याने १०० रुपये प्रवेश शुल्काच्या स्वरूपात स्वीकारण्यास सुरुवात केली. त्या मोबदल्यात पर्यटकांना 'रिडिमेबल व्हाउचर' दिले जात असून त्याचा पर्यटकांना फायदा होतोय. प्रवेशातून पैसे कमविणे हा या मागील उद्देश नसून केवळ गैरप्रवृत्तीपासून पर्यटकांचा बचाव करण्यासाठीची ही एक उपाययोजना आहे. 


सुरक्षिततेसाठी योजलेल्या या पुढाकाराने कौतुक करताना पर्यटकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. नियमित भेट देणारे शाहरुख पटेल यांनी सांगितले की, हा सुलाचा खूप चांगला पुढाकार आहे. पाहुण्यांना सुरक्षित आणि आरामदायी अनुभूतीसाठी या उपाययोजना कौतुकास्पद आहेत. काही जणांकडून यापूर्वी महिला, जोडपे यांना डिवचण्याचे प्रकार घडत होते. सुदैवाने आता ते रोखले जातील. 


नाशिकमध्येच शैक्षणिक संस्था चालविणाऱ्या सुमन दत्ता म्हणाल्या, विनियार्ड्समध्ये आलेल्या काही व्यक्ती वाईट नजरेने पाहताना आढळायचे. पण आता ठरविण्यात अालेल्या सुला विनियार्डमध्ये प्रवेश शुल्कामुळे अनावश्यक हाेणारी गर्दी यापुढे हाेणार नाही. यामुळे येथे भेट देणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि सुखद अनुभव देणारा हा निर्णय ठरेल, असा विश्वास वाटतो. महिलांसाठी सुरक्षित पर्यटनस्थळ झाल्याने नवीन र्पयटकांची निश्चित वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


गेल्या वर्षी अडीच लाख पर्यटकांनी दिली भेट 
नाशिकमधील सुला विनियार्डनेे २००५ मध्ये देशातील पहिले वाइन टेस्टिंग रूम स्थापन करून वाइन टुरिझमच्या क्षेत्रात मैलाचा दगड रोवला आहे. २००७ मध्ये 'बियॉन्ड' हे पहिले 'विनियार्ड रिसॉर्ट' तर २०१७ मध्ये 'द सोर्स' हे देशातील पहिले हेरिटेज रिसॉर्ट साकारण्याचा बहुमान 'सुला विनियार्ड'नेे पटकावला अाहे.विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख पर्यटकांनी नाशिकजवळील सुला विनियार्डला भेट दिली होती. दरवर्षी हाेणाऱ्या कार्यक्रमांनाही हजाराे पर्यटकांनी हजेरी लावली हाेती. 


दहा लाख लिटर वाइनची विक्री 
सुला विनियार्डने वाइन आणि स्पिरीटस टुरिझमकरिता अत्यंत प्रतिष्ठेचा असा 'ड्रिंक्स; बिझनेस अवॉर्ड-२०१६' हा पुरस्कार पटकावला अाहे. जुलै २०१८ मध्ये सर्वाधिक दहा लाख (एक मिलियन) वाईन विक्रीचा टप्पा गाठणारी सुला ही देशातील पहिली वाइन कंपनी ठरली आहे. सुला सिलेक्शन्सच्या माध्यमातून जगविख्यात असे रेमी कॉईन्ट्रे, हार्डिज् कोनो सूर, ले ग्रॅण्ड नोईर अशा ब्रॅण्ड्स मायदेशात उपलब्ध झाल्याने देशातील संगीतप्रेमी त्याचा आनंद घेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...