आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून काँग्रेस- उद्याेगमंत्र्यांमध्ये जुंपली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून सप्टेंबर महिन्यात गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अाहे. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा पिछाडीवर हाेता. परंतु  अाता महाराष्ट्र पिछाडीवर असून विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा गुजरातला लाभ हाेत अाहे. भाजप- शिवसेनेच्या काळात महाराष्ट्राची अाैद्याेगिक अधाेगती झाली, अशी टीका कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.  


अाघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत सतत अग्रेसर राहिला. देशात येणाऱ्या एकूण विदेशी थेट गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु देशांतर्गत येणाऱ्या खासगी गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या चार वर्षांपासून सतत पिछाडीवर अाहे. केंद्रीय वाणिज्य व उद्याेग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अाकडेवारीमध्ये कर्नाटकात २०१६ मध्ये १ लाख ५४ हजार १७३ काेटी तर गुजरातमध्ये ५६ हजार १५६ काेटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव अाले. 


पण त्या तुलनेत महाराष्ट्रात केवळ ३८ हजार १९३ काेटी रुपयांचे प्रस्ताव अाले. मागील वर्षातही कर्नाटकात १ लाख ५२ हजार ११८ काेटी रुपये, गुजरातमध्ये ७९ हजार ६८ काेटी रुपयांचे प्रस्ताव अाले, पण महाराष्ट्रात केवळ ४८ हजार ५८१ काेटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव अाहे. म्हणजेच महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर राहिला.   या विराेधात अाम्ही नेहमीच अावाज उठवला मात्र सरकारकडून त्यावर केवळ गुळमुळीत स्पष्टीकरण दिल्याची टीका चव्हाण यांनी केली.

 

महाराष्ट्र गुंतवणुकीचे अाकर्षक केंद्र नसल्याचा अाराेप
कर्नाटक सारखे कांॅग्रेसशासित राज्य काेणताही गाजावाजा न करता एक तृतीयांश गुंतवणूक अाकर्षित करीत अाहे. मात्र भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र अाता गुंतवणुकीसाठी अाकर्षक केंद्र राहिलेले नाही. यास भाजपसाेबत शिवसेनाही जबाबदार असल्याचा अाराेप करून अशाेक चव्हाण यांनी ‘स्टंॅडअप इंडिया’  याेजनेत बंॅकांच्या प्रत्येक शाखेत किमान एक दलित, एक अादिवासी व एक महिला लाभार्थी झाल्याचे उद्दिष्ट गाठण्यात दिरंगाई झाली अाहे. त्यामुळे ही याेजना सपशेल फसली असल्याचा अाराेप केला. 

 

उद्याेगमंत्र्यांचा दावा : प्रस्ताव अाणि प्रत्यक्ष गुंतवणूक अाणण्यात महाराष्ट्रच आघाडीवर

भारतात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीत तर महाराष्ट्र आघाडीवर आहेच, शिवाय, इन्व्हेस्टमेंट इंटेशन्स प्रत्यक्ष गुंतवणुकीत परावर्तित होण्यातसुद्धा महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट होते आहे, असा दावा करत उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी खासदार अशाेक चव्हाण यांचे अाराेप खाेडून काढले. 


महाराष्ट्राची बदनामी करणारे अशाेक चव्हाण माजी उद्योगमंत्री असूनही याबाबत इतके अज्ञानी असतील, अशी अपेक्षा अाम्ही केली नव्हती, असा टाेलाही देसाई यांनी लगावला. ‘अशाेक चव्हाण जे अाकडे सांगत अाराेप करत अाहेत ते गुंतवणुकीच्या प्रस्तावांचे आकडे आहेत, प्रत्यक्ष गुंतवणुकीचे नाहीत. हे माहिती असूनसुद्धा केवळ सरकारला विरोध म्हणून हा पोरकटपणा त्यांनी करावा हे  हास्यास्पद आहे.  गेल्यावर्षी ११ नोव्हेंबर रोजीच हाच कागद पुढे करून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर अाराेप केले हाेेते. तेव्हा ‘तुम्ही महाराष्ट्रद्वेषी की महाराष्ट्रहितैषी?’ असा प्रश्न आम्ही विचारला होता. अाता चव्हाण यांनाही हाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, असेही देसाई म्हणाले.  

 

महाराष्ट्रात ११, कर्नाटकात फक्त ३ प्रकल्प : देसाई 

- अशोक चव्हाण यांनी केंद्राच्या संकेतस्थळावर जाऊन प्रत्यक्षात किती प्रकल्प सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित झाले हे पाहावे. महाराष्ट्रात ११, तर कर्नाटकातील केवळ ३ प्रकल्प कार्यान्वित झालेत. सप्टेंबर महिन्यात किती इन्व्हेस्टमेंट इंटेशन्स (आयईएम) पार्ट बी भरून प्रत्यक्ष अमलात आले (इम्प्लिमेंट) त्याचीही माहिती स्वतंत्रपणे दिली आहे.  
- रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते जून तिमाहीची जारी केलेली आकडेवारी पाहिली तर आजही सर्वाधिक ३१ % विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली, तर कर्नाटकात केवळ ८ टक्के गेली. त्यामुळेच कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकले, असे म्हणणे हे दिशाभूल करणारे आहे.  
- आयईएममध्ये उद्योजक स्वत:हून इंटेड फाइल करत असतात. अगदी कोणतीही व्यक्ती १०००  रुपये भरून आपल्याला गुंतवणूक करायची आहे, हे जाहीर करू शकते. ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. गुंतवणूक केल्यानंतर अर्जाचा पार्ट बी भरायचा असतो. तोही ऐच्छिक आहे. राज्यात प्रत्यक्ष गुंतवणूक किती झाली, यावरूनच राष्ट्राचे अग्रेसरत्व ठरतेे आणि त्यात महाराष्ट्र पुढेच आहे.

बातम्या आणखी आहेत...