आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तंत्रज्ञानामुळे 2 रुपयांनी महागले पेट्रोल-डिझेल!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1 एप्रिल 2020 पासून देशभरात BS6 उत्सर्जन मानक लागू करण्यात येणार आहेत. नवीन आणि अधिक कठोर प्रदूषण उत्सर्जन मानदंड भारतीय बाजारपेठेत अनेक बदल घडवून आणतील आणि त्यामुळे कारच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. HT मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार BS6 इंधन मिळण्यास सुरुवाच झाली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 2 रुपयांची वाढ निश्चित केली आहे. 

 

दिल्ली राज्याने बीएस 6 इंधनाचे मानदंड पूर्ण केले असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संसदेच्या वरच्या सदनाला सुचित केले होते. BS6 मानक असलेले इंधन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इंधनापेक्षा वेगळे आहे. भारत सरकारने BS6 इंधनासाठी एप्रिल 2020 ही तारीख निश्चित केली आहे. 


एप्रिल 2020 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे. कारण किरकोळ विक्रेता बीएस 6 अनुपालन इंधनाच्या निर्मितीच्या उच्च किमतीपेक्षा पार करू इच्छित आहेत. रिफायनरीजनी नवीन क्लीनर इंधनाच्या उत्पादनाच्या सुविधेत बदल करण्यासाठी तब्बल 30 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केले आहे. यामुळे 2020 च्या निश्चित वेळेपूर्वीच BS6 पेट्रोल-डिझेल मिळण्यास सुरुवात होईल. 

 

हा पैसा विशेष उपकर किंवा शुल्काच्या रुपात वसूल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यानंतर बजेट प्रस्तावाच्या घोषणेदरम्यान पेट्रोल प्रति लिटर 2.5 आणि डिझेल प्रति लिटर 2.3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. BS6 ग्रेड असणाऱ्या इंधनाची संरचना भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इंधनापेक्षा वेगळी आहे. BS6 इंधनाच्या वाढत्या दरामुळे ऑटो सेक्टरच्या विक्रीत घट पाहण्यास मिळू शकते.


सध्या कार मार्केट मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अनेक लोकप्रिय कार निर्माता कंपन्यांनी आपल्या प्रोडक्शन लाइन्स देखील थांबवल्या आहेत. अशातच BS6 इंधनामुळे कारच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे. सध्या भारत जगभरातील सर्वांत मोठ्या ऑटोमोबाइल बाजारातील एक देश आहे. पण या नवीन नियमांमुळे कारच्या विक्रीत घट होऊ शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...