आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली दरवाजामुळेच अपघात कमी, नगरकर सुरक्षित; \'चिपको आंदोलन\' करावे लागणार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली दरवाजा वाचवण्यासाठी आता असे \'चिपको आंदोलन\' करावे लागणार.... चित्र - रवि भागवत. - Divya Marathi
दिल्ली दरवाजा वाचवण्यासाठी आता असे \'चिपको आंदोलन\' करावे लागणार.... चित्र - रवि भागवत.

नगर- रस्तारूंदीसाठी दिल्ली दरवाजा पाडला, तर अवजड वाहने थेट शहराच्या मध्यवस्तीत शिरतील. भरधाव जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढून नवे प्रश्न निर्माण होतील. दिल्ली दरवाजामुळे सध्या ही वाहने आत येऊ शकत नसल्याने नगरकर थोडेफार सुरक्षित आहेत, असे मत व्यक्त करत ही वेस पाडण्याचा आततायीपणा महापालिकेने करू नये, असे मत अनेकांनी व्यक्त केले. 


दिल्ली दरवाजा ही केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर तिचा उपयोग शहराचे संरक्षण करण्यासाठी होत असे. सुरक्षेचा व व्यापारी नाका म्हणजे या वेशी होत्या. आजही या वेशींचे महत्त्व कमी झालेले नाही. या वेशीमुळे वाहतुकीला अडथळा न होता उलट वाहतुकीचे नियमन होत आहे, असे मत 'स्वागत अहमदनगर'च्या सदस्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले. 


दिल्ली दरवाजा न पाडता या रस्त्यावरील वाहतुकीला खरा अडथळा ठरणारे विजेचे खांब, तारांचे जाळे, रस्त्यावर बसणारे पथारीवाले, फळांच्या व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या हटवल्या, तरी प्रश्न सुटू शकतो. शहरात वाहनतळांची संख्या पुरेशी नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. ही वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला, तर वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी पुरेशी जागा मिळेल, असे मतही व्यक्त करण्यात आले. 


बडोदे येथे पुरातत्व शास्त्राचा अभ्यास करणारी गिरिजा दुधाट म्हणाली, केवळ वाहतुकीचे कारण पुढे करून दिल्ली दरवाजाचा बळी देणे योग्य नाही. खरेतर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने अशा वास्तू जपण्याला अग्रक्रम दिला पाहिजे. औरंगाबाद, बडोद्यासारख्या अनेक शहरांत असे ऐतिहासिक दरवाजे असून त्यांचे जतन किती चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे, हे संबंधितांनी पाह्यला हवे. दरम्यान, दिल्ली दरवाजा पाडण्यात येऊ नये म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून हे निवेदन महापालिकेला देण्यात येणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...