आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलैंगिक संबंध उघड होण्याची भिती, आधी शिऱ्यातून गुंगीचे औषध दिले, नंतर कारसह जिवंत जाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहिबाबाद - उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद शहरातील टीला रोडवर कारमध्ये आम आदमी पार्टीच्या नेत्याचा मृतदेह कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. या AAP नेत्याची हत्या समलैंगिक संबंधांमुळे झाल्याचे समोर आले आहे. समलैंगिक संबंघ सर्वांसमोर उघड होण्याच्या भितीने आरोपीने AAP नेते नवीन यांना जिवंत जाळले. 


आरोपी सय्यद यांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी ते एका गे पार्टीत नवीन यांना भेटले होते. त्यानंतर ते दोघे अनेक दिल्लीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये गे पार्ट्या करू लागले होते. नवीन काही महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी दबाव आणू लागले होते. त्यासाठी त्याने दोघांचा एक अश्लिल व्हिडिओदेखित तयार केला होता. तो वारंवार हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. या समलैंगिक संबंधांचा खुलासा होण्याच्या भीतीने सय्यदने त्याच्या 2 साथीदारांच्या मदतीने कट पूर्ण केला. 


आरोपींनी आधी कट रचला आणि नंतर 4 ऑक्टोबरच्या सायंकाळी नवीन यांना फोन करून बोलावले. नवीन यांना शिऱ्यामध्ये गुंगीचे औषध खाऊ घातले. बेशुद्धावस्थेत सय्यद यांनी नवीन यांना फोन केला आणि नेट बँकिंगचा पासवर्ड विचारत त्यांच्या खात्यामध्ये 7 लाख 85 हजार रुपये ट्रान्सफर केले. आरोपींनी मोबाईलबरोबरच इतर साहित्यही घेतले. रात्री उशिरा आरोपी त्याच्या दोन सहकाऱ्यांसह टीला रोडला आला आणि त्याने नवीनला बेशुद्धावस्थेत कारमध्ये बसवले आणि पेट्रोल टाकून कारला आग लावली. त्यानंतर तिघे आरोपी स्कुटीवर बसून निघून गेले. 


पोलिसांनी आरोपींकडून नवीनचा मोबाईल, 4 लाख रुपये आणि हत्येसाठी वापरण्यात आलेली स्कूटी जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेसाठी आरोपींनी अनेक तास नवीनचे फेसबूक अकाऊंट वापरले. त्यामुळे पोलिसांना लोकेशन बदललेले आढळले. 

 

बातम्या आणखी आहेत...