आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून जन्मली मुलगी, माहेर-सासर आणि प्रियकरानेही स्विकारण्यास दिला नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर(हरियाणा)- एका महिलेने लग्नानंतर अनैतिक संबंध बनवले. यानंतर महिला गरोदर राहिली. सुरुवातील त्यांनी गर्भपात करण्याचा विचार केला, पण तसे करता आले नाही. प्रियकराने तिला लग्न करेल आणि होणाऱ्या मुलाचे संगोपण करेल अशी ग्वाही दिली, पण त्याने महिलेला आपल्या पतीला घटस्फोट देण्याची अट घातली. महिला यासाठी तयार झाली आणि कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर पती-पत्नी वेगळे झाले. त्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. आता त्या महिलेला तिच्या सासरले आणि माहेरचे, कोणीच स्विकारायला तयार नाहीत. महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. शहरातील यमुनानगर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी तलम-376-2(एन) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण यूपीच्या नक्कुडचे असल्याने केस तिकडे ट्रांसफर केला आहे. याप्रकरणी नक्कुड पोलिस पुढील तपास करत आहेत.


 

महिला म्हणाली- मुलीचा डीएनए तपासा, तो प्रियकराचाच निघेल
महिलेने पोलिसांना तक्रारीत म्हटले की, तिचे लग्न चार वर्षांपूर्वी नुक्कडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झाले होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गोकुल नाव्याच्या व्यक्तीने तिच्यासोबत मैत्री करण्याचे विचारले, त्यावर महिलेने मैत्रीस नकार दिला. पण एके दिवशी तो तिच्या घरी आला आणि मैत्री नाही केली तर आत्महत्या करेल अशी धमकी दिली. त्यानंतर 2017 पासून त्यांच्यात संबंध बनले आणि या दरम्यान महिला गरोदर झाली. तिने आता एका मुलीला जन्म दिला आहे आणि तिचे म्हणने आहे की, ही मुलगी गोकुलचीच आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...