आक्रमक पवित्रा / आक्रमक पवित्रा : धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिरपूर पाटबंधारे कार्यालयासमोर आंदाेलन, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला
 

प्रतिनिधी

Jun 11,2019 08:20:00 AM IST

शिरपूर (जि. धुळे) - तालुक्यातील अनेर धरणाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मांजरोद येथील शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पाटचारीतून पाणी सोडले तर मोबदला न मिळालेले शेतकरी व पाणी सोडले नाही तर ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही ते शेतकरी आत्महत्या करण्याचा इशारा देत असल्याने पाटबंधारे विभाग कात्रीत सापडला आहे.


अनेर धरणाच्या दहा नंबरच्या पाटचारीतील पाच नंबरच्या उपचारीतून मांजरोद येथील शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. या चारीत पाटबंधारे विभागाने दोन ठिकाणी माती टाकून पाणी अडवले आहे. त्यामुळे मांजरोद भागातील २४ शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. पाटचारीतून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला
सोमवारी साडेअकराच्या सुमारास मांजरोद येथील शेतकरी शहरातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर आले. या वेळी काही शेतकऱ्यांनी हातात असलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलच्या बाटल्या व आगपेटी हिसकवली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले.

X
COMMENT