Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Due to less salary, teacher becomes a two-wheeler thief

कमी पगारामुळे गरजा पूर्ण होत नसल्याने शिक्षक बनला दुचाकीचाेर, पुतण्यासह अटक

प्रतिनिधी, | Update - Jul 18, 2019, 08:21 AM IST

वाढत्या गरजा, कुटुंबीयांचे उपचार, अन्य खर्चाची सोय होत नसल्याने दुचाकी चोरीकडे वळाल्याची शिक्षकाची कबुली

  • Due to less salary, teacher becomes a two-wheeler thief

    धुळे - अत्यल्प पगार, कुटुंबाच्या वाढत्या गरजांमुळे शिक्षक चक्क दुचाकी चोरीकडे वळल्याचा प्रकार समाेर अाला आहे. यात त्याला साथ देणाऱ्या पुतण्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक विजय गवळी आणि हृषीकेश गवळी अशी या काका-पुतण्यांची नावे आहेत.


    धुळे परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहर पोलिसांचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. त्यातच नंदुरबार येथील शिक्षक गवळी हे पुतण्याच्या मदतीने जुन्या दुचाकी विक्री करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, शंका आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. विजय गवळी हे नंदुरबार येथील सुंदरसे गावातील श्राॅफ माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. या संस्थेला कमी अनुदान असून फक्त २० टक्के पगार त्यांच्या हातात येत होता. दुसरीकडे वाढत्या गरजा, कुटुंबीयांचे उपचार, अन्य खर्चाची सोय होत नसल्याने आपण दुचाकी चोरीकडे वळलो, अशी कबुली विजय गवळी यांनी दिली. दोघांकडून सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Trending