आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To Poor Roads, Police Took The Elderly On Shoulder From House To To The Ambulance

खराब रस्त्यामुळे पोलिसांनी वृद्धेला खांद््यावरून अॅम्ब्युलन्सपर्यंत नेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटावा - उत्तर प्रदेशातील इटावा येथे पोलिसांतील माणुसकीचे दर्सन घडले.  पूरग्रस्त कायंछी गावात ७५  वर्षीय महिला आजारी पडली. खराब रस्त्यामुळे अॅम्ब्युलन्स गावापर्यंत पोहोचू शकली नाही. या वेळी पोलिस या आजारी महिलेला खांद्यावरून तीन किमी घेऊन गेले आणि अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाकल केले. भरेह ठाण्याचे प्रभारी सतीश राठौर यांनी सांगितले की, चंबळ  नदीला पूर आला आणि पावसामुळे रस्ता खराब झाला. त्यामुळे वाहने गावापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे आम्ही महिलेला बाजेवर झोपवून अॅम्ब्युलन्सपर्यंत नेले. इटावाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा म्हणाले की, पोलिस कर्मचाऱ्यांचे हे काम प्रशंसनीय आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा सुधारेल आणि लोक पोलिसांकडे विश्वासाने पाहतील. भरेह ठाणे प्रभारींसहित सर्व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.