आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणीला अल्पप्रतिसाद मिळाल्याने एसटी महामंडळाच्या 'स्मार्टकार्ड'साठी आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासभाडे सवलतीसाठी राबवण्यात येत असलेल्या 'स्मार्टकार्ड' योजनेला ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १ एप्रिलपासून हे कार्ड बंधनकारक असेल.


ही स्मार्टकार्ड याेजना १ जून २०१९ पासून सुरू करण्यात आली हाेती. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्टकार्ड मिळविणे बंधनकारक करण्यात आले हाेते. मात्र नोंदणीला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता ही मुदत वाढवून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यास परिवहनमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, व्याधीग्रस्त रुग्ण यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मासिक, त्रैमासिक पासधारकांना १५ फेब्रुवारीपासून आणि विद्यार्थ्यांना १ जुनपासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागू करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी सध्याचीच कार्यपद्धती लागू राहील.
 

बातम्या आणखी आहेत...