आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् एका सोशल पोस्टने लातूरकरांची झाली धावाधाव

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘मला वाचवा, मला माझा मुलगा ठार मारण्याचा प्रयत्न करतोय’ अशी पोस्ट एका महिलेच्या सोशल साइटच्या अकाउंटवर पडली आणि लातूरसह राज्यातील विविध भागांतील लोकांची गुरुवारी चांगलीच दमछाक झाली. काही जणांनी महिलेला शोधूनही काढले. ही पोस्ट चुकून पडली असून, असे काही नसल्याचा खुलासा महिलेने केल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर चुकून कशा पडतात असाही प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे.    गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. एका महिलेने आपल्याला मुलापासून वाचवावे असे पोस्टमध्ये टाकले होते. त्यांच्या मेसेज बॉक्समध्ये त्यांनी अशाच प्रकारची विनवणी केल्यानंतर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह काही जणांनी पोस्ट आणखी व्हायरल केली. यानंतर काही जणांनी महिलेला शोधूनही काढले. त्यांच्याशी बोलल्यावर ही पोस्ट चुकून पडल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. दरम्यान, महिलेच्या या ‘चुकून’ पोस्टमुळे त्यांच्या काळजीपोटी मात्र अनेकांना चांगलीच पळापळ करावी लागली.