आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीनबागमध्ये स्थानिकांच्या आंदोलनाला सोमवारी एक महिना पूर्ण झाला. आंदोलनात महिला आणि मुलेही सहभागी झाली आहेत. आंदोलनाचे नेतृत्व कोणताही मोठा नेता करत नाही. आंदोलकांचे म्हणणे आहे की, ते सर्वजण नेते आहेत आणि सीएएविरोधात एकत्र आलेत. गेल्या महिन्यात १५ तारखेला येथे निदर्शने सुरू झाली. याचा परिणाम केवळ स्थानिकच नव्हे तर दिल्ली आणि परिसरातील लोकांवरही झाला आहे.
कोंंडीमुळे दहा मिनिटांचे अंतर पार करायला दीड तास लागत आहेत
निदर्शनांमुळे शाहीनबाग- कालिंदी कुंज रस्ता बंद आहे. केवळ अर्धा किमी रस्ता अडवला आहे. मात्र हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. हा रस्ता नोएडामार्गे दक्षिण दिल्लीला जोडतो. सुमारे चार लाख लोक रोज या रस्त्याचा वापर करतात. कोंंडीमुळे दहा मिनिटांचे अंतर पार करायला दीड तास लागत आहेत. बदरपूर, फरिदाबादच्या लोकांना नोएडा जाण्यासाठी आश्रम-डीएनडी मार्गाने जाण्यास भाग पडत आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, शाहीनबागमध्ये १०० मोठी दुकाने आहेत. निदर्शनांमुळे ते चार आठवड्यांपासून बंद आहेत. यामुळे बाजारपेठेला सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
दुकाने बंद असल्याने शोरूम, दुकानाच्या कामगारांना नोकरी जाण्याची भीती आहे. मजूर काम सोडून गावी परतत आहेत. सरिता विहाराचे लोक रस्ता मोकळा व्हावा म्हणून निदर्शने करत आहेत.
जामिया हिंसाचार : २९ दिवसांनी कुलगुरू म्हणाल्या- कोर्टात जाणार
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी म्हटले आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास पुन्हा सुरुवात केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासनाने या सत्रातील उर्वरित परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.