आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To The Construction Of The Dam, The 12 Thousand Year Old City 'Hasnakif' Will Go Under Water In A Few Days

धरण बांधल्यामुळे 12 हजार वर्षे जुने शहर 'हसनकीफ' काही दिवसातच जाणार पाण्याखाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा- तुर्कीच्या हसनकीफ शहरात "इलिसु" धरण बांधल्यामुळे, हे 12 हजार वर्षे जुने शहर काही दिवसातच पाण्याखाली जाणार आहे. शोधकर्त्यांचे म्हणने आहे की, हे मेसोपोटामियाच्या सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. इलिसु धरण तुर्कीमधील चौथे सर्वात मोठे धरण आहे. हे धरण अनेक वर्षांपासून वादाच्या भवऱ्यात होते. धरणामुळे मागच्या वर्षी 600 वर्षे जुन्या मस्जिदला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावे लागले. रिपोर्टनुसार, धरम बांधल्यामुळे 80 हजारपेक्षा अधिक लोक बेघर होणार आहेत.

धरणामुळे विजेची उत्पत्ती होईल
काही दिवसांपूर्वी स्थानीक गव्हर्नरने सांगितले की, हसनकीफची 8 ऑक्टोबरल घेराबंदी केली जाईल. तेथील रहिवास्यांना घर रिकामे करण्यासाठी 1 महिन्यांचा वेळ दिला होता. धरण बनवल्यानंतर मोठी विजेची उत्पत्ती होईल.

हे शहर दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये टिगरिस(दजला) नदीच्या किनाऱ्यावर आहे. इहिहासकारानुसार ऐतिहासिक रूपाने महत्वाचे असलेले हे शहर 12 व्या शतकातील आहे. शहरात त्या काळातील पुलाचे अवशेष, 15 व्या शतकातील मकबरे, दोन मस्जिदचे अवशेष आणि शेकडो नैसर्गिक गुफा आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...