• Home
  • Gossip
  • Due to the current situation in Jammu and Kashmir, actress Richa Chadha said 'Tomorrow is Eid, please remove curfew'

Bollywood / जम्मू-काश्मीरच्या सद्य परिस्थितीनंतर अभिनेत्री रिचा चढ्ढा म्हणाली - 'उद्या ईद आहे, कृपया संचारबंदी हटवा'   

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिले उत्तर 

दिव्य मराठी वेब

Aug 11,2019 03:49:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केले गेले आहे. मात्र तरीही राज्यामध्ये अजूनही परिस्थिती सामान्य नाही. काश्मीरमध्ये अजूनही अनेक ठिकाणी कर्फ्यू लागलेला आहे. अशातच जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर अभिनेत्री ऋचा चड्ढाने एक ट्वीट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये ऋचा चड्ढाने लिहिले, 'उद्या ईद आहे, मी प्राधिकरणाकडे अपील करते की, काश्मीर मधून संचारबंदी हटवली जावी. लोक आपल्या म्हाताऱ्या आई वडील आणि मुलांसाठी खूप चिंतीत आहेत. माझे काही मित्र आहेत, जे तेव्हापासून रात्री झोपू शकत नाहीयेत, जेव्हापासून याची घोषणा झाली आहे.'

अभिनेत्री ऋचा चड्ढाच्या या ट्वीटवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी उत्तर दिले आहे. अशोक पंडित यांनी ऋचाच्या या ट्वीटला रिट्वीट करत लिहिले, 'ईद मुबारक ऋचाजी, येथे काहीही चिंता करण्यासारखे नाही. सर्वकाही कंट्रोलमध्ये आहे. येथे दगड फेकणारे, स्वातंत्र्य मागणारे, तुकडे-तुकडे गॅंग आणि पाकिस्तानच्या सपोर्ट्ससाठी रिस्क आहे. तुमचे मित्र काही कारणांमुळे झोपू शकत नसतील. 70 वर्षांच्या जुन्या दुखण्याचे उपचार झाले आहेत, थोडा वेळ तर लागेलच.'

X
COMMENT