आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरामुळे तहसीलदारांनी चप्पूवरून मतदारांना नेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी - वडवणी तालुक्यात नदीची पाणीपातळी वाढल्याने मतदानापासून वंचित राहणाऱ्या एका वस्तीवरील मतदारांना महिला तहसीलदारांनी थेट चप्पूवरून (थर्मकोलची होडी) नदी पार करून देत मतदान केंद्रापर्यंत सुखरूप पोहाेचवले.    
वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत भीम नाईक तांड्यावरील नागरिकांना  खळवट निमगावमध्ये येण्यासाठी देव नदी ओेलांडून यावे लागते. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. साेमवारी सकाळीही या मंडळात ६४ मिमी इतका जोरदार पाऊस झाल्याने देव नदीच्या पाण्याची पातळी वाढली.  पाणीपातळी कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. सुमारे ६५  जण मतदानापासून वंचित राहणार होते. तहसीलदार सुरेखा स्वामी यांना ही माहिती कळताच त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना दिल्या. देवगाव येथील एका भोई समाजाच्या व्यक्तीकडून एक चप्पू उपलब्ध करण्यात आला. स्वत: तहसीलदार स्वामी यांनी चप्पूवर बसून इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांना नदी पार करून दिली. यामुळे सुमारे ६५ मतदारांना मतदान करता आले.  
 
 

बातम्या आणखी आहेत...