• Home
  • Due to the height of 8 feet, this person did not get a room in a hotel, he is fan of Afghanistan team

लखनऊ / 8 फूट उंचीमुळे या व्यक्तीला मिळाली नाही हॉटेलमध्ये रूम, अफगानिस्तान टीमचा आहे फॅन 

शेर खान काबुलहून अफगानिस्तान आणि वेस्ट इंडीजमध्ये होणार क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आला आहे  

दिव्य मराठी वेब टीम

Nov 07,2019 12:14:00 PM IST

लखनऊ : अफगानिस्तान आणि वेस्ट इंडीज यांची क्रिकेट मॅच पाहण्यासाठी आलेल्या अफगाणी नागरिकाला आपल्या उंचीमुळे खूप त्रासाचा सामना करावा लागला. त्याला राहण्यासाठी एकही हॉटेल मिळाले नाही. शेर खानची उंची आठ फूट दोन इंच आहे. नाईलाजाने त्याला पोलिसांकडे जावे लागले. पोलिसांनी कशीतरी त्याच्यासाठी एका रूमची व्यवस्था केली. शेर खानने सांगितले की, माझा वेष आणि उंचीमुळे कोणत्याही हॉटेलने मला राहण्यासाठी रूम दिली नाही.

अफगानिस्तानने लखनऊला आपले घराचे मैदान बनवले आहे. टीमला वेस्ट इंडीजविरुद्ध अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये तीन वन डे, तीन टी 20 आणि एक आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच खेळायची आहे. पहिली मॅच बुधवारी खेळली गेली.

हॉटेल मालक रूम देण्यास टाळाटाळ करत होते...

शेर खान अफगानिस्तानच्या काबुलमध्ये राहतो. तो एअरपोर्टहून नाका भागामध्ये आला होता. शेर खानला 500 रुपयांमध्ये हॉटेलची रूम हवी होती. या भागात अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे 500 रुपयांपर्यंत रूम मिळते. त्याची उंची जास्त असल्यामुळे हॉटेलचे मालक त्याला रूम देण्यात टाळाटाळ करत होते. पोलिसांनी सांगितले की, हॉटेलच्या मालकांना वाटले की, शेर खानला रूम दिल्यामुळे त्यांना समस्यांचा सामना करावा लगेल.

लखनऊ पोलिसांचे मानले आभार...

शेर खान मंगळवारी दुपारी तीन वाजता नाका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे असलेले पोलिस अधिकारीदेखील त्याची उंची पाहून हैराण झाले. पोलिसांना शेर खानची उंची आणि त्याचा अवतार पाहून संशय येऊ लागला. अधिकाऱ्यांनी त्याची कागदपत्रे तपासली. खूप वेळ पासपोर्ट, व्हिसाची तपासणी केली गेली. हॉटेलची व्यवस्था झाल्यानंतर शेर खानने लखनऊ पोलिसांचे आभार मानले. सिरीज संपल्यानंतर तो अफगानिस्तानला परतणार आहे.

X
COMMENT