आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावणी - सप्तशृंग गडावरून नवस फेडून नाशिककडे जाणारा भाविकांचा टेम्पो कृष्णगाव येथील गतिरोधकावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. त्याला नाशिककडे जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या ट्रकने पाठीमागून जोडदार धडक दिली. त्यात आयशरमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. आशिष माणिकसिंग ठाकूर (२७, रा. त्र्यंबकेश्वर), सागर अशोक ठाकूर ( २२, रा. नाशिक), कुणाल कैलास ठाकूर(१९ नाशिक) आणि गणेश भगवती प्रसाद ठाकूर (३८, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. आयशरमधील भाविक हे सप्तशृंग गडावर नवस फेडण्यासाठी आले होते. रविवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटाेपून ते परतीच्या प्रवासास निघाले असता आयशरमध्ये अपघातापूर्वी दोन ठिकाणी बिघाड झाला होता. त्यानंतर पुन्हा आयशर कृष्णगाव येथील गतिरोधकावर रात्री ११.३० वाजता नादुरुस्त झाला होता. त्यामुळे काही जण खाली उतरले होते. ते बचावले.
काही जण बसमध्ये गेल्याने बचावले
आयशरमधील काही प्रवासी खाली उतरले होते. सुदैवाने त्यांनी येणाऱ्या बसला थांबवत बसमधे बसून नाशिककडे निघाले. त्यामुळे ते वाचले, तर उर्वरित प्रवासी गाडीच्या खाली उभे होते, तर काही गाडीत बसलेले होते. सुमारे रात्री १२.३० वाजेदरम्यान नाशिककडे कांदा भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्या उभ्या असलेल्या आयशरला मागून जोरदार धडक दिली. त्या धडकेत आयशरमधील प्रवासी जागीच ठार झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.