अक्षय्य तृतीया / या सात चुकांमुळे नाराज होते देवी लक्ष्मी, मिळत नाही अक्षय्य पुण्य

सुख-समृद्धी आणि संपन्नता प्रदान करणारी पवित्र तिथी अक्षय्य तृतीया या वेळेस 7 मे 2019 मंगळवारी आहे, येथे जाणून घ्या, या दिवशी कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे.

रिलिजन डेस्क

Apr 30,2019 12:10:00 AM IST

वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया किंवा आखा तीज म्हटले जाते. सुख-समृद्धी आणि संपन्नता देणारी ही पवित्र तिथी या वेळेस 7 मे 2019 मंगळवारी आहे. सनातन परंपरेमध्ये अक्षय्य तृतीयेला खूप महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी केलेले स्नान-दान, यज्ञ, जप-तप इ. कर्माचे अक्षय्य पुण्य पाप्त होते. या दिवशी विधीने साधना आराधना करणाऱ्या साधकाला माता लक्ष्मीची कृपा होते. पण या दिवशी अजाणतेपणामुळे व्यक्तीकडून काही अशा चुका होतात, ज्यामुळे शुभ गोष्टीऐवजी अशुभ फळ मिळते.


1. अक्षय्य तृतीये दिवशी दानाला विशेष महत्व आहे. या गोष्टीला लक्षात ठेऊन अनेक लोक दानामध्ये महादान म्हणजे कन्यादान करतात. मात्र या दिवशी दान करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा शुभफळ मिळण्याऐवजी आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या दिवशी गरजूंना दान आणि जेवण दिल्याने चांगले फळ मिळते.


2. अक्षय्य तृतीये दिवशी कोणाविषयीसुद्धा मनात द्वेष भावना ठेऊ नये आणि पुजा करताना क्रोध करू नये. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आराधना केल्यानंतर जर एखादी व्यक्ती आपल्या मनात द्वेषाची भावना ठेवत असेल किंवा दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करत असेल तर लक्ष्मी त्याच्यावर कधीही कृपा करत नाही.


3. धनत्रयोदशी सारखेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीचे महत्त्व असते. या दिवशी काहीतरी खरेदी करावी, रिकाम्या हाताने घरी जाऊ नये. या दिवशी रिकाम्या हाताने घरी जाणे अशुभ मानले जाते. तसे तर अक्षय्य तृतीये दिवशी सोने खरेदीला शुभ मानले जाते पण जर शक्य नसेल तर आपल्या क्षमतेनुसार एखादी धातूची वस्तू किंवा गरजेचे सामान खरेदी करू शकतो.


4. देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी निवास करते. खरंतर स्वच्छता आणि सुव्यवस्थाच्या स्वभावाला 'श्री' म्हटले गेले आहे. म्हणून ज्या घरात वस्तू व्यवस्थित पद्धतीने ठेवलेल्या असतात म्हणजे , चप्पल, बुट, कपडे इ. आणि साफ सफाई असते, त्या घरात देवी लक्ष्मी सदैव राहाते. त्यामुळे अक्षय्य तृतीये दिवशी घरात स्वच्छता ठेवा.


5. अक्षय्य तृतीये दिवशी लक्ष्मी पुजनासोबतच विश्वाचे पालनकर्ते भगवान विष्णूंची पुजा केली जाते. या पुजेमध्ये प्रसादासोबत तुळशीचा प्रयोग केला जातो. पण लक्षात असु द्या की प्रसाद ठेवण्यासाठी तुळशीचे पान अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करूनच तोडावे, नाहीतर शुभफळा ऐवजी अशुभ फळ मिळते.


6. आयुष्यात नेहमी मोठ्यांचा, वृद्धांचा सन्मान केला पाहिजे आणि चुकूनही त्यांचा अपमान करू नये. अक्षय्य्य तृतीये दिवशी या गोष्टीचे विशेष पालन करावे आणि वृद्धांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. जर एखादा व्यक्ती या दिवशी मोठ्या व्यक्तीचा अपमान करत असेल किंवा अपशब्द वापरत असेल तर याचे अशुभ फळ मिळते.


7. जर समृद्धी आणि सौभाग्य दोन्ही इच्छेसाठी तूम्ही अक्षय्य्य तृतीयेची पुजा करत असाल तर चुकूनही भगवान विष्णू आणि लक्ष्मीची वेगळी पुजा करू नका, कारण देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू पती-पत्नी आहेत. या पवित्र तिथीवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सोबत पुजा केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते.

X
COMMENT