आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खीरामची शोककथा की, सुखीरामाची आत्मकथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इरशाद कामिल


'आता हो किसी को तो
वो ये करके दिखाये,
परछाईं से तेरी हैं मैंने रंग बनाये ।
जितना मैं बढ़ता हूं उतना
ये मुझसे आगे बढ़ता है,
दुःख साला आवारा कुत्ता
मेरे ही पीछे पड़ता है।'

अशी काही वाक्ये मी एका रिक्षाच्या मागच्या बाजूला वाचली तेव्हापासून हीच वाक्यं माझ्या डोक्यात पक्की बसली आहेत.

माहिती नाही हे योग्य आहे की नाही, पण यावर विचार करणे गरजेचे आहे. हवा जशी सर्वत्र असते, जसे परमेश्वर सर्व ठिकाणी असतात तसेच सुख आणि दु:खही सर्वच ठिकाणी असतात. मला हे सांगायचं आहे की, दु:खी होणे ही पण एक कला आहे.

माझे एक काका होते. त्यांनी या कलेत पीएचडी केली होती. दु:खाचं तेज हे त्यांच्या चेहऱ्यावर इतकं असायचं की, जर हसून त्यांच्याकडे कुणी पाहिलं तर त्यांना दाढदुखी व्हायची. असं वाटायचं की देवाने मिनिस्ट्री ऑफ नेगिटीव्हिटीचा स्वतंत्र चार्जच त्यांच्याकडे दिलाय. ते चष्मा घालायचे, मी अनेकदा त्यांच्या चष्म्याचा नंबर त्यांना विचारायचो, पण काका प्रत्येक वेळी लक्षात नाही म्हणून टाळायचे. मला त्यांचा नंबर यासाठी जाणून घ्यायचा होता की, त्या नंबरपर्यंत पोहोचण्यासाठी माझे डोळे अांधळे करून घ्यायचे असा मी विचार करायचो. कारण त्यांच्या चष्म्यातून प्रत्येक कामात कमतरता, प्रत्येक गोष्टीत दोष, प्रत्येक व्यक्ती वाईट, प्रत्येक नात्यात स्वार्थ अशा प्रत्येक गोष्टीत त्यांना भटका कुत्रा दिसायचा. त्यांची बोलण्याची भाषा अनेक वेळा इतकी तिरकी आणि तिखट असायची की त्यांचे बोलणे ऐकून एखाद्याच्या कानातून धूर निघायचा. काही लोक असेच असतात, ज्यांचं बोलणं खूप तिखट असतं. अशाच लोकांना दु:खी राहण्यात पण सुख मिळते. दु:खी होऊन ते त्यागाची आणि बलिदानाची मूर्ती बनतात की, ज्यावर स्वत:च फुलं चढवतं राहतात. स्वत:च कौतुक करत ते स्वत:च्या नजरेतच ते इतके महान बनतात की तुम्हाला वाटू लागते की हे लोक नेपोलियन किंवा महात्मा गांधींच्या युगात का जन्मले नाहीत? त्या काळात जन्मले असते तर त्यांना ज्ञान देऊन अजून महान बनवले असते या दु:खीरामांनी.

असे अनेक लोक असतात, ज्यांना हसल्यावर खूप त्रास होतो आणि सुख मिळाल्याल्यावर त्यांना गिल्ट वाटू लागते. त्यांना वाटते की, जर ते आनंदी झाले तर आपण जगाच्या भल्यासाठी केलेला सर्व त्याग, उपकार आणि बलिदान खोटे ठरतील. ते प्रत्येक विवाहात, गुंतवणुकीत किंवा वाढदिवसाला मनाच्या शांतीसाठी जातात, काही मुले, पुरुष हसत असतील किंवा आनंदाने नाचणाऱ्या मुली मुलींना उगाचंच काही धडे देऊ लागतात, मिठाईत किंवा जेवणात काय कमी आहे यावरच बोलतात. या लोकांचं ब्लडप्रेशर वाढतं तर यांना शुगरसुद्धा होते. यांना पायदुखीचा तसेच पाठदुखीचाही त्रास असतो. म्हणजेच काही आनंदाचा सण, उत्सव असेल तर अशा वेळी यांचे आजार उफाळून येतात. कारण घरातले लोक, पाहुणे सतत यांच्याकडे येऊन यांच्या तब्येतीची विचारपूस करावी, या वेळी आपण किती महत्त्वपूर्ण आहोत अशी भावना यांच्या मनात निर्माण होते. कमी शब्दात सांगायचं झालं तर रंगात भंग घालण्याची कला यांना चांगलीच अवगत असते. आपलं महत्त्व कमी तर होत नाही ना? याची भीती या लोकांना सतत वाटते.

दुसरीकडे माझे एक शेजारी आहेत ते सुखीराम. एकदा एका चोराने त्यांचे पाकीट चोरले. त्या वेळी काही लोकांनी त्या चोराला लगेच पकडले आणि त्याला मारहाण करू लागले. त्या वेळी चोराने अगदी भावुक आणि दयेच्या नजरेने सुखीराम यांना पाहिलं तर काकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले, मारू नका त्या गरिबाला. बिचाऱ्याच्या अडचणी असतील म्हणून त्याने चारी केली असेल. घे मुला १०० रुपये आणि जेऊन घे. एकदा ओल्या फरशीवर चालताना घसरून पडले आणि पायाला सूज चढली. त्या वेळी काका काही तासच दु:खी होते मग लगेच हसून बोलले, बरं झालं पडलो. आता ऑफिसला सुटी घेऊन घरी दिलीप कुमारचे चित्रपट बघणार. एकंदरीत विचार केला तर इथं फरक हा विचारांचा, दृष्टिकोनाचा, स्वभावाचा, बुद्धीचा आहे. प्रत्येक गोष्टीवर आपण का रडायचं, दु:खी व्हायचं आणि दुसऱ्यांना दोष देत राहायचं. आपला दृष्टिकोनच तर अंधारालाही उजेडात बदलू शकतो.

आता हो किसी को तो
वो ये करके दिखाये,
परछाईं से तेरी हैं मैंने रंग बनाये ।


कवि अाणि गीतकार इरशाद कामिल

officepost.irshad@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...