आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dungarpur Rajasthan News In Hindi: Police Arrested Interstate Chain Snatching Gang

वारंवार पाणी प्यायला जात होती आरोपी महिला.. पोलिस होते कन्फ्यूज, एक्स-रे रिपोर्ट पाहून थक्क झाले सगळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डूंगरपूर (राजस्थान)- पोलिसांनी सोमवारी आंतरराज्यीय चेन स्नेचिंग टोळीचा पर्दाफाश करून सर्व आरोपींना अटक केली. या टोळीचे नेतृत्त्व एक महिला करत होती. टोळीतील एका महिलेला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पोलिेसांनी महिलेला पाठलाग करून ताब्यात घेतले. तितक्यात महिलेने चक्क सोन्याची चेन (साखळी) गिळंकृत केली. पोलिसांनी टोळीतील आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे चेन सापडली नाही. चौकशीसाठी पोलिसांनी सर्व आरोपींना पोलिस स्टेशनमध्ये आणले.

 

वारंवार पाणी प्यायला जात होती आरोपी  महिला..पोलिस कन्फूज..

आरोपींकडे चेन न सापडल्याने पोलिसही आश्चर्यचकीत झाले. यादरम्यान, चेन गिळणारी महिला वारंवार पाणी प्यायला जात होती. ते पाहून पोलिसांना तिच्यावर संशय आला. ठाणे अंमलदारांनी महिलाचा एक्स-रे करण्याचे निर्देश दिले. एक्स-रे रिपोर्ट पाहून पोलिसही थक्क झाले.

 

महिलेचा एक्स-रे करण्यात आला. तिच्या पोटात चेन दिसून आली. महिलेला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. पोलिस महिलेच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवून आहे. महिलेसह दोघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही टोळी कारमध्ये फिरते. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जावून महिलांच्या गळ्यातील चैन चोरण्याचे काम करते.

 

आरोपीच्या पो‍टातील चेन काढण्यासाठी करावे लागेल ऑपरेशन...

वैद्यकीय सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महिलेच्या पोटातील चैन सहजासहजी बाहेर निघणे शक्य नाही. त्यासाठी ऑपरेशन करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...