आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलाईन वॉटर मिसळून तयार करत होते बनावट रक्त, 3500 रुपयात विकली जात होती 1 बॅग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - युपी एसटीएफने राजधानी लखनऊमध्ये रक्ताच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड करत सात लोकांना अटक केली आहे. हे लोक मानव रक्तामध्ये सलाईन वॉटर मिसळून दोन बॅग रक्त तीन बॅग करून 3500 रुपये प्रती बॅगनुसार विकत होते. हे आरोपी बनावटी रक्त लखनऊच्या विविध हॉस्पिटल आणि ब्लड बँकमध्ये विकायचे.


15 दिवसांची रेकी केल्यानंतर युपी एसटीएफने गुरुवारी रात्री गोपनीय पद्धतीने मडियाव स्थित मेडिसिन अँड ब्लड बँक हॉस्पिटल आणि बीएनके हॉस्पिटलवर छापा टाकला. यामध्ये बनावटी रक्ताच्या अनेक बॅग आणि गॅंगचा सूत्रधार मोहम्मद नसीम आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.


एसटीएफने जप्त केलेले रक्त तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. एसटीएफनुसार ही गॅंग अत्यंत हुशारीने हा गोरखधंदा खूप दिवसांपासून चालवत होती. सामान्य मनुष्य रक्तामध्ये सलाईन वॉटर मिसळून बनावट रक्त तयार केले जात होते. एक बॅग रक्तामध्ये सलाईन वॉटर मिसळून दोन बॅग केले जात होते. तयार केलेले बनावट रक्त खोटे ब्लड डोनेशन फॉर्म दाखवून मोठ्या हॉस्पिटलमध्ये विकत होते. एक बॅगचे 3500 रुपये घेतले जात होते.


गॅंगचा मुख्य आरोपी नसीम स्वतःच्या घरातच बनावटी रक्त तयार करण्याचे काम करत होता. एसटीएफने बीएनके ब्लड बँकच्या लॅब टेक्निशियन आणि लॅब अटेंडंटलाही अटक केली आहे. एसटीएफनुसार, माडियावमध्ये हा काळा बाजार खूप दिवसांपासून चालू होता. एसटीएफने 15 दिवस ब्लडबँकवर पाळत ठेवली. पुरावे गोळा केल्यानंतर एसपी अमित नागर यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी रात्री छापा टाकण्यात आला. या प्रकरणात आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...