आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवी पास आरोपी यूट्यूबच्या मदतीने छापत होता दोन हजारांच्या नकली नोटा, आतापर्यंत छापले इतके कोटी रूपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - एनआयए आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 1.20 कोटी रूपयांच्या नकली नोटांसह दोन आरोपींना अटक केली होती. कासिम आणि वसीम अशी दोघांची नावे आहेत. आरोपी कासिमने सांगितले की, कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या लालसेपोटी त्याने यूट्यूबद्वारे नकली नोटील बनविण्याचा गोरखधंधा माहीत करून घेतला होता. पाच महिन्यांपर्यंत असे अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर कासिमने आपल्या मुख्याध्यापकाचा मुलगा वसीमसोबत मिळून 1.20 कोटी रूपयांच्या दोन हजारांच्या नोटांची छपाई केली. या खुलास्यानंतर पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहे. 

 

फक्त आठवी पास आहे आरोपी 
आरोपी कासिम हा फक्त आठवी पास आहे. पोलिसांच्या मते, तो कमी शिकलेला असुनही चांगल्याप्रकारे कॉम्प्युटर हाताळत होता. याचाच फायदा घेत त्याने यूट्यूबवर नकली नोट छापण्याचे व्हिडिओ शोधून अनेकवेळा पाहिले. व्हिडिओ पाहून जेव्हा वसीमला खात्री झाली की, तो आता या गोरखधंद्याची सुरुवात करू शकतो. त्यानंतर त्याने प्रिंटरद्वारे नोटांची छपाई केली.


पाकिस्तानातून येत होता कागद आणि शाई
आरोपींनी मेवात व गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी या नोटा चालवल्या असल्याचे मानले जात आहे. आरोपींना चौकशी दरम्यान सांगितले की, मेवात येथील आपल्या राहत्या घरी नोटांची छपाई करत होते. यासाठी लागणारा कागद आणि शाई नेपाळमार्गाने पाकिस्तानातून येत होते. या प्रकरणात इतरही लोक सहभागी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.