आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांभुर्णीत बनावट विदेशी दारूचा कारखाना उदध्वस्त; चौघे ताब्यात, मुद्देमालासह मशीन जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल/जळगाव- विदेशी बनावट दारु तयार करणाऱ्या डांभुर्णी (ता.यावल) येथील एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारला. या ठिकाणाहून ३ लाख ४६ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल व बाटल्या सीलंबद करण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून कारखान्याचा मुख्य सूत्रधार फरार आहे. या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधीर आढाव यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री डांभुर्णी (ता.यावल) येथील कपिल मधुकर सरोदे यांच्या खळ्यातील खोलीत सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला. तेथे विशाल काशीनाथ फालक (वय २९), शरद युवराज कोळी (वय ३०), सुनील एकनाथ सोनवणे (वय ४५) व कपिल मधुकर सरोदे (वय ४०, सर्व रा.डांभुर्णी, ता.यावल) यांना पथकाने अटक केली तर मुख्य सूत्रधार जितेंद्र लालचंद सोनवणे (रा. वढोदा, ता. यावल) हा बेपत्ता झाला आहे.

 

जप्त केलेला मुद्देमाल असा.
पथकाने कारखान्यातून मशीन, बनावट दारुच्या २४, रिकाम्या ६५ बाटल्या, देशी दारुच्या बाटलीचे ५ हजार बुच, इर्सेसच्या (रंग व चव द्रव्य) ४ बाटल्या, १२ खोके, २५ लिटर स्पिरिट, प्लास्टिक ट्रे, इम्पीरियल ब्ल्यूच्या १५७ सीलबंद बाटल्या, २०० प्लास्टिक कॅप व बुचे, मालवाहू चारचाकी (एमएच-१९, बीएम, ३३९७) जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...