Mantra / रोज सकाळी अशाप्रकारे करावा दुर्गा सप्तशतीच्या या 1 मंत्राचा जप

आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येत राहतात. काही सोपे उपाय करून या समस्यांमधून मार्ग काढला जाऊ शकतो...

रिलिजन डेस्क

Aug 24,2019 12:20:00 AM IST

आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येत राहतात. काही सोपे उपाय करून या समस्यांमधून मार्ग काढला जाऊ शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, दुर्गा सप्तशतीमध्ये सांगण्यात आलेल्या मंणत्रच जप केल्याने मोठ्यातील मोठी अडचणी दूर होऊ शकते. यामधील एक खास मंत्राचा जप केल्यास आर्थिक तंगी दूर होऊ शकते. हा मंत्र आणि जप करण्याची विधी पुढीलप्रमाणे आहे....


मंत्र
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो:
स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि।
दारिद्रयदु:खभयहारिणि का त्वदन्या
सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता।।


या विधीनुसार करावा जप
1. रोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत.


2. त्यानंतर आई-वडील, गुरु आणि कुलदेवतेचे स्मरण करून कुशच्या आसनावर बसावे.


3. समोर देवी दुर्गाचा फोटो स्थापित करावा. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिवा मंत्र जप पूर्ण होईपर्यंत चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.


4. रुद्राक्षाच्या माळेने कमीत कमी 108 वेळेस जप करावा.


5. रोज या मंत्राचा जप केल्याने तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.

X
COMMENT