आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • During The Festive Season, Car Companies Are Offering Discounts Of Up To 5 Lakh On Many Models

सणांच्या हंगामात कार कंपन्या देत आहेत अनेक मॉडेल्सवर ५ लाखांपर्यंतची सूट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सणाच्या हंगामात विक्री वाढवण्यासाठी कार कपंन्या विविध मॉडेल्सवर लाखो रुपयांपर्यंतची सूट देत आहेत. धनतृयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी एक्सचेंज ऑफरही सुरू केली आहे. होंडासारख्या कंपन्या ५ लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहेत. ह्युंदई टस्कन मॉडेलवर २ लाख रुपयापर्यंतची ऑफर सुरू आहे. यामध्ये १.२५ लाखापर्यंतचे कॅश डिस्काउंट आणि ७५ हजार रुपये एक्सचेंज आॅफरचा समावेश आहे. 

दुसरीकडे, मारुती सुझुकी आपल्या एसक्रॉस मॉडेलवर १.१२ लाख रुपयांची ऑफर देत आहे. यामध्ये ५० हजार रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, ३० हजार एक्सचेंज ऑफर, १० हजार रु. कॉर्पाेरेटशिवाय ५ वर्षांची वॉरंटी समाविष्ट आहे. फॉक्सवॅगन पोलो मॉडेलवर ८१ हजार रुपयापर्यंतचे कॅश आणि २० हजार रुपयापर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
 

कंपन्या ५ वर्षांच्या वॉरंटीसह देताहेत एक्सचेंज ऑफर
> होंडा सीआरव्ही 4डब्ल्यूडी: ५ लाखा- पर्यंत कॅश डिस्काउंट
> होंडा सीआरव्ही 2डब्ल्यू डी डिझेल: ४ लाखापर्यंत कॅश डिस्काउंट
> ह्युंदाई टस्कन : २ लाखांचे फायदे  (१.२५ लाखापर्यंत कॅश + ७५ हजारापर्यंत एक्सचेंज ऑफर)
> जीप कंपास: डीलरस्तरावर १.५ लाख ते १.७५ लाखापर्यंत सूट
> मारुती ब्रेझा: सुमारे १ लाखाची ऑफर ( ४५ हजार कॅश +२० हजाराची एक्सचेंज + ७ हजार कॉरर्पाेरेट +  ५ वर्षांची वाॅरंटी) 

>  ह्युंडई क्रेटा १.६: एक लाख तक ऑफर ( ५० हजार कॅश +  ३० हजार एक्सचेंज + अतिरिक्त ४ वर्षांची वाॅरंटी व आरएसए) 
> महिंद्रा एक्सयूवी ५००: एक लाखापर्यंत ऑफर (४० हजारापर्यंत कॅश +४५ हजार एक्सचेंज +  १० हजारअॅसेसरीज + डीलर- कडून विम्यावर सूट)
 

सूट नसलेले मॉडल  
> ह्युंदाई ग्रँड आय १० निओस,
> मारुती एस-प्रेसो,
> मारुती एक्सएल६
> ह्युंदाई वेन्यू
> एमजी हॅक्टर
> किया सेल्टॉस
​​​​​​​> रेनॉ ट्रायबर
> मारुती अर्टिगा
​​​​​​​

सॅन्ट्रोची स्पेशल एडिशन लाँच 
ह्युंदाईने सॅन्ट्रो स्पोर्ट एसई नावाने तिची अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच केली आहे. ही स्पेशल एडिशन मॉडेल स्पोर्ट व्हेरिएंटवर आधारित आहे. ही मॅन्युअल व एएसटी दोन्ही पर्यायात आहे. मॅन्युअल व्हर्जनची किंमत ५.१६ लाख रुपये आहे. स्पोर्ट एएसटी व्हर्जनची किंमत ५.७४ लाख रुपये आहे. ही ४ सिलिंडरी पेट्रोल इंजिन असून ६८ बीएचपी आणि ९९ एनएमची शक्ती देते.