आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सवकाळात साईचरणी ४ कोटी विक्रमी देणगी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ (शिर्डी) यांच्या वतीने दि. ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या करण्यात आलेल्या १०१ व्या साईबाबा पुण्यतिथी उत्सवात सुमारे २ लाख २५ हजार साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

मुगळीकर म्हणाले, श्री पुण्यतिथी उत्सवात सशुल्क व ऑनलाइन पासेसद्वारे एकूण ५७,४३,८०० रु. देणगी प्राप्त झाली. साई प्रसादालयात उत्सवकाळात २,०५,७३५ भक्तांनी प्रसाद भोजनाचा व ४३ हजार ४२२ भक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच १,०२,१६८ लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे २५,५४,२०० रु. प्राप्‍त झाले, तर २,१७,२०० मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे दर्शनरांगेतून वाटप करण्यात आले.

साई पुण्यतिथी उत्सव कालावधीत भक्तनिवास, धर्मशाळा, आदी ठिकाणी ५८,३७४, तर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात ५,६२७ अशी एकूण ६४,००१ साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

१९ देशांमधून परदेशी चलनाद्वारे ४,७०,९०३ रु. देणगी
- उत्सवकाळात दानपेटीत भक्तांनी टाकले तब्बल १,७३,८५,४१६ रु.
- साई मंदिरात असलेल्या देणगी काउंटरद्वारे ९१,०३,४७४. डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, चेक/डीडी, मनी ऑर्डर आदींद्वारे १,०८,७६,४५० रु.
- देणगीच्या स्वरूपात ३७५.९३० ग्रॅम सोने आले. (१२ लाख ६७ हजार)
- चांदी ३११०.३५० ग्रॅम (८३ हजार रुपये) जगभरातील एकूण १९ देशांमधून परदेशी चलनाद्वारे ४,७०,९०३ रु. देणगी या उत्सवकाळात प्राप्त झालेली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...