आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जाहिरातींवर करण्यात आला 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहिती अधिकारातून सरकारच्या काळातील जाहिरात खर्चावरील माहिती उघड
  • बारामती तालुक्यातील नितीन यादव यांनी मागवली होती माहिती
  • वाढदिवसाला वायफळ खर्च न करण्याचे फडणवीसांनी केले होते आवाहन

बारामती - राज्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वृत्तपत्र जाहिरात वगळता फक्त टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षांत तब्बल 15 कोटी 51 लाख रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती. बारामतीचे नितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मार्फत फडणवीस यांच्या कार्यकाळातील महाराष्ट्र शासनाचा टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरील जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील मागवला होता. यात काही तपशील उघडकीस आले आहेत. फडणवीस सरकारने 2017-18 साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे. तर याच वर्षात रेडिओ जाहिरातींवर तब्बल 1 कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपयांचा खर्च केला आहे.फडणवीस सरकारच्या काळात 2013-2014 मध्ये रेडिओ वाहिन्यांवर 59 लाख 96 हजार 291 रुपये इतका जाहिरांतीवर खर्च केला होता, तो वाढून 2018-2019 साली 1 कोटी 85 लाख 72 हजार 887 झाल्याचे दिसत आहे. तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी 2013-2014 साली 53 लाख 25 हजार 730 रुपये खर्च केला होता. तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2 कोटी 84 लाख 48 हजार 317 रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून समोर आली आहे. 

फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत जाहिरातींवर दिवसाला खर्च केले 85 हजार रुपये


फडणवीस सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 15 कोटी 51 लाख रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले दिसत आहे. या माहितीवरून दिवसाचा हिशोब केला असता फडणवीस सरकारने दिवसाला 85 हजार रुपये खर्च केला असल्याचा दावा यादव यांनी केला आहे.वाढदिवसाला वायफळ खर्च न करण्याचे फडणवीसांनी केले होते आवाहन 


विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या वाढदिवसाला वायफळ खर्च न करण्याचे आवाहन केले होते. 'वायफळ खर्च न करतो तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्या!, असे आवाहन करणाऱ्या फडणवीस यांच्या काळात सरकारी तिजोरीतून पाच वर्षात फक्त टीव्ही आणि रेडिओच्या जाहिरातींवर 15 कोटी 51 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आल्याची माहिती या माहिती अधिकारातून उघड झाली आहे.