आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • During The Shooting Of The Film 'Brahmastra 2' Controversy Happens Between Bouncers And Common People

वाराणसीमध्ये चित्रपट 'ब्रह्मास्त्र 2' च्या शूटिंगदरम्यान झाला गोंधळ, बाउंसर्स आणि सामान्य जनतेमध्ये झाले वाद 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर अपकमिंग चित्रपट ‘ब्रह्मास्त्र 2’ चे शूटिंग सध्या वाराणसीमध्ये सुरु आहे. अशातच चेतसिंह घाटावर चित्रपटातील एक मुख्य दृश्य चित्रित केले गेले. हा सीन तर अनेक रीटेकनंतर ओके झाला पण याचदरम्यान बाउंसर्स आणि घाटावर काम करणाऱ्या लोकांमध्ये वाद झाले. 

 

400 मीटरच्या अंतरावर बाउंसर करण्यात आले तैनात...
बीएचयूचे माजी एमएस डॉ. वीएन मिश्राने सांगितले की, रात्री जेव्हा रणबीर-आलिया यांचा नावेमधील सीन चित्रित केला गेला त्यादरम्यान आम्ही नेहमीप्रमाणे फिरायला निघालो तर मध्येच घाटावर बाउंसर्सने आम्हाला थांबवले. त्यावेळी त्या लोकांनी वाद सुरु केला. या सीनच्या शूटिंगदरम्यान लोकल पब्लिकला मोबाइल यूज न करण्याची ताकीद दिली गेली होती. घाटाच्या दोन्ही बाजूला 400 मीटरच्या अंतरावर फोर्स आणि बाउंसर तैनात करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...