आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • During The UPA 2, Average 7.36 Lakh New Jobs Were Made Annually; 53% Reduction In Modi's Era 

यूपीए-2 च्या काळात दरवर्षी सरासरी 7.36 लाख नव्या नोकऱ्या, मोदींच्या काळात 53% घट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने दरवर्षी एक कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रभावी शिक्षण, रोजगाराच्या पुरेशा संधी व उत्तम कौशल्य या तीन बाबींची गरज असते. यूपीए-2 च्या तुलनेत सध्याच्या सरकारवेळी नव्या नोकरीत 53 टक्के घट झाली आहे. यावर आधारित नॉलेज रिपोर्ट....

 

शिक्षण : 5 वर्षांत शिक्षणाच्या बजेटमध्ये 2% वृद्धी, यूपीए-2 काळात 80% ची वाढ होती

यूपीए-2: 

अर्थसंकल्पाच्या सरासरी 5.13% वाटा शिक्षणासाठी दिला.  

 

मोदी सरकार :

समग्र अर्थसंकल्पात शिक्षणासाठी  3.87% वाटा दिला.

 

> 92,275 सरकारी शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक स्तरावर सर्व विषयांसाठी एकच शिक्षक आहे. 
> खेड्यातील चारपैकी एका शाळेत वीज कनेक्शनही नाही. फक्त 21% शाळांमध्ये संगणक आहेत. 
> 5 वर्षांत व्यवसायिक अभ्यासक्रम 183% महागले
> पाच वर्षांत आयआयटी-आयआयएमचे शुल्क क्रमश: 123% व 55% वाढले. यूपीए-2 काळात ही वाढ 80% व 30% होती.

 

बेरोजगारी दर : 35 वर्षांत कधीच 3% पेक्षा जास्त नव्हता, आता पोहोचला 6.1%वर

मोदी सरकारच्या काळात नव्या नोकऱ्यांत 53% घट झाली आहे. दोन्ही सरकारवेळी आठ क्षेत्रांत प्राथमिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या रोजगाराचे चित्र खालीलप्रमाणे होते.....

 यूपीए-2 काळात :
7.36 लाख सरासरी नवे वार्षिक रोजगार निर्माण झाले.

 

सध्याच्या काळात 
3.50 लाख म्हणजे रोजगाराच्या संधी 53% कमी झाल्या.

 

बेरोजगारी दर नियंत्रणासाठी रोज ३३ हजार नोकऱ्यांची गरज 
देशातील बेरोजगारीचा दर नियंत्रणात आणण्यासाठी वार्षिक 1.2 कोटी रोजगार म्हणजेच रोज 33 हजार नव्या नोकऱ्यांची गरज आहे. 

 

स्किल इंडिया : 5%पेक्षाही कमी लोकांना रोजगाराभिमुख काैशल्यप्राप्ती
> 2022 पर्यंत 40 कोटी लोकांना  रोजगारानुरूप कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने 2015 मध्ये स्किल इंडिया अभियान आणले. बेरोजगारी कमी करणे, हा याचा उद्देश होता. 
> 17.60 लाखपैकी पहिल्या वर्षी फक्त 5.80 लाख लोकच प्रशिक्षण पूर्ण करू शकले. 
> 82 हजारच पात्रता धारण करू शकले. 
> 100 वर्षे लागतील या हिशेबाने लक्ष्य साध्य करण्यासाठी. 

 

230% वाढला शहरी युवक बेरोजगार होण्याचा वेग
सध्याच्या 15 ते 29 वर्षे गटातील युवकांचा सरासरी बेरोजगारी दर 19.22% वर गेला आहे. यूपीए-2 मध्ये तो 8.37% च्या आतच होता. 

 

स्रोत : लोकसभा आणि श्रम मंत्रालय, मागील 10 वर्षांतील अर्थसंकल्प, सांख्यिकी व नियोजन मंत्रालयाची आकडेवारी. 
 

बातम्या आणखी आहेत...