Home | National | Delhi | During the World War, 11 lakh Indian soldiers fought and 75 thousand martyrs were killed

महायुद्धात 11 लाख भारतीय सैनिक लढले, 75 हजार शहीद झाले, त्यात पंजाबचे निम्मे सैनिक

दिव्य मराठी नेटवर्क | | Update - Nov 11, 2018, 11:02 AM IST

सात लाख भारतीय सैनिक तुर्कीविरुद्ध लढले होते

 • During the World War, 11 lakh Indian soldiers fought and 75 thousand martyrs were killed

  नवी दिल्ली - पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिक सप्टेंबर १९१४ मध्ये ब्रिटनकडून युद्धात सहभागी झाले होते. कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशनच्या मते ४ वर्षे चाललेल्या युद्धात अखंड भारतातून ११ लाखांहून जास्त सैनिक लढले. भारतीय सैन्याने पूर्व आफ्रिका व पश्चिमेकडील मोर्चा सांभाळताना जर्मन साम्राज्याच्या विरोधात युद्ध लढले. त्याशिवाय भारतीय सैनिकांनी इजिप्त, फ्रान्स व बेल्जियममध्येही लढाई केली. सुमारे ७ लाख भारतीय सैनिक तुर्क साम्राज्याच्या विरोधात मेसोपोटाेमियामध्ये लढले. या युद्धात ७४ हजार ९११ भारतीय सैनिक शहीद झाले आणि ६७ हजार सैनिक जखमी झाले होते.


  फ्रान्समध्ये भारतीय व ब्रिटिश या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्व सर डग्लसने केले होते. १९१५ च्या सुरुवातीस भारतीय सैन्याला अाधी विश्रांती देण्यात आली होती. परंतु लवकरच ते परतले व ते भीषण रणसंग्रामात सक्रिय झाले. या युद्धात सहभागी झालेल्या ९२०० सैनिकांना शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पहिल्या महायुद्धातील निम्मे भारतीय सैनिक पंजाब प्रांतातील होते. त्यापैकी काही सैनिकांना स्वाक्षरी कशी करायची हेदेखील माहीत होते.
  पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ७४ हजार भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ दिल्लीत १९२१ मध्ये इंडिया गेटची पायाभरणी करण्यात आली होती. १९३१ मध्ये हे ऐतिहासिक द्वार साकारले गेले. त्यावर १३ हजार ३०० सैनिकांची नावे आहेत.


  युद्धादरम्यान भारतातून १ लाख ७२ हजार ८१५ जनावरांना युद्ध मैदानात पाठवण्यात आले होते. घोडे, खेचर, उंट, बैल व दुभती जनावरे पाठवण्यात आली होती. काही परदेशी गाढवांना भारतात प्रशिक्षण देऊन रणभूमीवर पाठवण्यात आले हाेते. तेव्हा युद्धामुळे असंख्य भारतीय कुटुंबे उघड्यावर आली होती.

  खर्च : युद्धावर १५ लाख कोटी खर्च, मित्रराष्ट्रांचे १०.७ लाख कोटी रुपये
  - पहिल्या महायुद्धावर सुमारे १५ लाख कोटी रुपये खर्च. त्यात मित्र राष्ट्रांचे १०.७ लाख कोटी रुपये खर्च झाले. त्यात ब्रिटिश साम्राज्याचा ३.४ लाख कोटींचा वाटा होता.
  - इतर सत्ताकेंद्रांनी ४.४ लाख कोटी रुपये खर्च केले. त्यात सर्वाधिक जर्मनीचे ३.३ लाख कोटी होते.
  - युद्धानंतर ब्रिटन, इटली व अमेरिकेच्या जीडीपीमध्ये वाढ झाली. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेची २७ टक्क्यांनी घसरण झाली होती. इतर देशांच्या जीडीपीतही घट.

  संघटना : ५८ देशांची लीग ऑफ नेशन्स स्थापन, दुसरे महायुद्ध रोखू शकले नाही
  - युद्धानंतर १० जानेवारी १९२० राेजी लीग ऑफ नेशन्सची स्थापना. त्यात ५८ देश सहभागी झाले होते. हे देश १९ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धाला रोखू शकले नव्हते.
  - २८ जून १९१९ मध्ये पॅरिस शांतता करारावर स्वाक्षरी. त्यात एका बाजूने जर्मनी. दुसऱ्या बाजूने फ्रान्स, इटली, ब्रिटन व इतर महाशक्ती होत्या.
  - करारात जर्मनीकडून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. युद्धाचा ठपका जर्मनीवर ठेवला होता.

  शतकपूर्ती : अमेरिका, फ्रान्स व ७० देशांत विविध कार्यक्रम
  पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतासह जगभरातील ७० देशांत कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. सर्वात मोठा कार्यक्रम फ्रान्समध्ये आहे. तेथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासह ६० राष्ट्रप्रमुख सहभागी झाले आहेत. ब्रिटनमध्ये शहीद पहिल्या व अखेरच्या सैनिकास श्रद्धांजली अर्पण केली गेली.

  काय बदलले : युद्धानंतर ९ देशांची निर्मिती
  - महायुद्ध संपताच ऑस्ट्रिया-हंगेरीमधून ऑस्ट्रिया, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, युगोस्लाव्हियात तयार झाले. जर्मनी-रशियातून एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, पोलंड, फिनलंड बनले.
  - १०० वर्षांत ५१ आफ्रिकन देश व ४४ नवे आशियाई देश जगाच्या नकाशावर तयार झाले. जगभरात सैनिकांच्या स्मरणार्थ २ लाखांहून जास्त स्मारके आहेत.

  रंजक : ब्रिटनशी २.५० लाख सैनिक असे लढले, त्यांचे वय १८ वर्षांहून कमी होते
  युद्धात ब्रिटिश जनरलला लढाई करण्यास मनाई करण्यात आली होती. कारण सगळे मोठे अधिकारी ठार झाले तर रणनीती तयार कशी होणार ? अशी भीती ब्रिटनला होती. युद्धात ब्रिटनकडून १८ वर्षांहून कमी वयाची २.५० लाख सैनिक लढले होते. सर्वात लहान वयाचा सैनिक १२ वर्षांचा होता. युद्धादरम्यान सैनिकांपर्यंत एक आठवड्यात १.२ कोटी पत्रे पोहोचवली.

Trending