आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरगावच्या भगवान भक्तिगडावर आज दसरा मेळावा; 370 कलम रद्द केल्याने अमित शाहांना 370 तोफांची सलामी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा - संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगावच्या भगवान भक्तिगडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा मंगळवारी दुपारी एक वाजता होत आहे . या मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून मोदी सरकारने काश्मीर मध्ये ३७० कलम हटवल्याने या निर्णयाचे ३७० तोफांची सलामी व तिरंगी झेंडे फडकवून स्वागत केले जाणार आहे . सावरगावात जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे . दरम्यान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यंदा गोपीनाथगड ता. परळी ते भगवानभक्ती गड अशी रॅली काढली जाणार मंत्री पंकजा मुंडे यांना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध होऊ लागल्याने मागील तीन वर्षापासुन पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या संत भगवान बाबांच्या जन्म गावात मागील दोन वर्षापासुन दसरा मेळावा होत असुन यंदाचे तिसरे वर्ष आहे . या मेळाव्याला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत . विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर यंदाचा हा मेळावा विक्रमी असण्याची शक्यता आहे .

तीन हेलिपॅड तयार; पोलिस अधीक्षकांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे (आयबी, सीआयडी, सीआरएफ) या तिन्ही सुरक्षा यंत्रणांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे हे हेलिकॉप्टरने सावरगावला येणार असल्याने येथे स्वतंत्र तीन हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षकांसह चार अप्पर पोलिस अधिक्षक, दहा उपाधिक्षक, सोळा निरीक्षक, महिला कर्मचारी, होमगार्ड यांच्यासह जवळपास दोन हजार पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाचीही तुकडी तैनात करण्यात आली आहे. वाहनासाठी गहिनीनाथ गड मार्गे कुसळंब रस्ता, मुगाव व पाटोद्याकडून येणाऱ्या प्रमुख तिन्ही रस्त्यावर दीड किलोमीटर अंतरावर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना आठ ठिकाणाहून प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे

खासदार प्रीतम मुंडेंची गोपीनाथगड ते भगवान भक्तिगड रॅली
दसरा मेळाव्या निमित्ताने खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यंदाही गोपीनाथगड ते भगवानभक्ती गड रॅली काढली जाणार असुन यंदा या रॅलीचेही तिसरे वर्ष आहे . गोपीनाथगड येथून मंगळवारी सकाळी ०६.३० मिनिटांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे. हजारो कार्यकर्ते आपलीचारचाकी वाहने घेऊन सहभागी होणार आहे ही रॅली गोपीनाथ गड, सिरसाळा, तेलगाव, वडवणी, बीड, नायगाव, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंबमार्गे भगवान भक्तीगड सावरगाव घाट अशी निघेल.

१ लाख झेंडे रोवण्याचे नियोजन
मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्यामुळे या मेळाव्यास प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने ३७० तोफांची सलामी दिली जाणार असुन ३७० तिरंग्या झेंड्यांनी स्वागत केले जाणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी एक लाखापर्यंत भगवे झेंडे लावण्यात येणार आहे .विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेते सावरगावला येणार असल्याने हा मेळावा ऐतिहासिक होणार आहे.

गुढया उभारून होणार स्वागत !
सावरगावात मंगळवारी दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रत्येक गावकरी घरासमोर रांगोळ्या काढून गुढ्या देखील उभारण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खाडे यांनी सांगितले आहे.