आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DVM Special | 50% Of Women Undergoing Plastic Surgery Are Younger Than 26, The Reason Beautiful Husbands And Progress

प्लास्टिक सर्जरी करवून घेणाऱ्या ५० टक्के तरुणींचे वय २६ पेक्षा कमी, सुंदर पती अन् बढतीसाठी सारा खटाटोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिन्ही छायाचित्रांतील महिला एकच आहे. ३० वर्षीय वू शियोचेनने १६ वर्षांत १०० पेक्षा जास्त सर्जरी करवून घेतल्या - Divya Marathi
तिन्ही छायाचित्रांतील महिला एकच आहे. ३० वर्षीय वू शियोचेनने १६ वर्षांत १०० पेक्षा जास्त सर्जरी करवून घेतल्या
  • चीनमध्ये अॅपमुळे कॉस्मेटिक सर्जरीचा ट्रेंड, ३ वर्षांत २-३ पट वाढल्या अशा सर्जरी
  • एका वर्षात १.६३ कोटी लोकांनी केली अशी सर्जरी

बीजिंग - चीनच्या तरुणींमध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करवून घेण्याचा ट्रेंड वाढतो आहे. येथील तरुणी मोठे डोळे, गोबरे गाल, पातळ नाक व पाय नाजूक दिसावेत म्हणून या शस्त्रक्रिया करवून घेत आहेत. चायना असोसिएशन आॅफ प्लास्टिक अँड अॅस्थेटिक्सच्या ताज्या अहवालानुसार, ३ वर्षांत प्लास्टिक सर्जरी करवून घेणाऱ्यांच्या संख्येत २ ते ३ पटीने वाढ झाली आहे.२०१७ मध्ये १.६३ कोटी लोकांनी सर्जरी केली.
यात निम्म्याहून अधिक महिला २६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. त्या बहुतांश दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या शहरातील आहेत. अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जरी करवून घेणाऱ्या तरुणींची संख्या ६ टक्क्यांपेक्षा घटली आहे. तज्ज्ञांनुसार, याचे कारण सो-यंग व गेंगमई यासारखे अॅप आहेत. हे अॅप सर्जरी आधी व नंतरचे फोटो जनरेट करतात. या अॅपवर सर्जनची तारीख घेता येते. सर्जरीसाठी कर्जही सुलभ हप्त्यात मिळते. गेंगमेई अॅपवर ३.६ कोटी युजर्स असून २० हजार सर्जन्स आहेत. सो-यंग अॅपवर दरमहा २४.७ लाख युजर्स येतात आणि यावर ६ हजार सर्जन्स आहेत. कॉस्मेटिक सर्जरीच्या ट्रेंडवर संशोधन केलेल्या हाँगकाँग विद्यापीठातील जेंडर स्टडीज विभागाचे प्रा. ब्रेंडा अॅलग्रे यांनी म्हटले, तरुणींमध्ये वाढत्या कॉस्मेटिक सर्जरीचे मोठे कारण तेथील पितृसत्ताक समाज आहे. येथे सुंदर दिसणे म्हणजे तुमच्या कामात यश मिळवाल आणि तुम्हाला सुंदर पती मिळेल असा समज आहे. येथील सर्जन मोठी ऑफर देतात. एका सर्जरीच्या किमतीत दोन सर्जरी करण्याची ऑफर खूप लोकप्रिय आहे. येथे डोळे मोठे दिसावेत यासाठीची सर्जरी फक्त १४३ डॉलरमध्ये होते. ती शेजारी देशांच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. परंतु सर्व  सर्जरी यशस्वी होत नाहीत, ही सर्वात मोठी समस्या आहे.  प्लास्टिक सर्जरीच्या वेडापायी १६ वर्षांत केल्या शंभरावर सर्जरी


३० वर्षीय वू शियोचेनने १६ वर्षांत १०० पेक्षा जास्त सर्जरी करवून घेतल्या. तिने सांगितले, लहानसहान बदलासाठी सर्जरी केल्या. ते वेडच लागले.