आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DVM Special : मान्सूनच्या 86 दिवसांपैकी 55 दिवस कोरडे, ऑगस्ट महिन्यात 22 दिवसांचा दीर्घ खंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : या पावसाळ्यात ७ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत ८६ दिवसांपैकी ५५ दिवस कोरडे राहिले. उर्वरित ३१ दिवसांत काही वेळेत पाऊस पडला आहे. सप्टेंबरच्या नऊ दिवसांत कमी-अधिक फरकाने पाऊस पडत आहे. मात्र, स्थळनिहाय पर्जन्यमानात कमालीचा फरक आहे. खंडाचे व पर्जन्यमानाचे प्रमाण वेगवेगळे आहे. अशाही परिस्थितीत औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात ९७.६७ टक्के तर मराठवाड्यात एकूण ९३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात केवळ सात दिवस पाऊस पडला असून २२ दिवस मोठा खंड पडल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. या खंडाचा थेट कृषी उत्पादनावर विपरित परिणाम होणार असल्याचे कृषी तज्ञांचे म्हणने आहे.

मे अखेर ते ७ जूनपर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडतो. तो यंदा झाला नाही. ७ ते ३० जून दरम्यान विभागात केवळ ९ दिवस पाऊस पडला. १५ दिवस कोरडे गेले. परिणामी खरीप पेरणी लांबणीवर पडली होती. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. जुलै महिना हमखास पावसाचा मानल्या जातो. मात्र, हवामानातील बदल, अपोषक वातावरणाच्या परिणामामुळे पावसाचे दिवस कमी झाले आहेत. ३१ दिवसांपैकी १३ दिवस कमी अधिक फरकाने पाऊस पडला. तर १८ दिवस कोरडे गेले. हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने पेरणी क्षेत्रात वाढ करणे व उगवलेल्या पिकांना तग धरून ठेवण्यासाठी जुलैमधील पाऊस उपयुक्त ठरला. ऑगस्ट महिन्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे आयएमडीने म्हटले आहे. पण ते औरंगाबाद विभागासाठी अपवाद ठरते. ३१ दिवसांपैकी केवळ ९ दिवस पाऊस पडला. उर्वरित २२ दिवस पावसाचा खंड राहिला. अधून-मधून पडणाऱ्या पावसाने पीक जगवण्यासाठी फायदा झाला. मात्र, पिकांची उगवण ते वाढ होण्यावर विपरित परिणाम झाले आहेत. त्याचे उत्पादकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. शिवाय पाण्याचे जलस्रोत कोरडे ठाक आहेत. त्यामुळे गत आठ दिवसांत ७५ मिमी पाऊस पडलेला असला तरी चिंता कायम आहे. मात्र, भुरभुर ते मध्यम पावसाच्या सरींनी पिकांना संजीवनी मिळाली आहे.

जिल्हानिहाय पर्जन्यमान दिवसात
औरंगाबाद पाऊस कोरडे
जून ०८ १६
जुलै १७ १४
ऑगस्ट ९ २२
४८७.२४ मिमीच्या तुलनेत ४०१.६७ मिमी म्हणजे ८२.४४ टक्के पाऊस प्रत्यक्षात पडला.

जालना पाऊस कोरडे
जून ९ १५
जुलै १३ १८
ऑगस्ट ७ २४
४९८.४३ सरासरी पावसाच्या तुलनेत ३५५.८९, ७१.४० टक्के पाऊस

येथे भयावह स्थिती
बीड पाऊस कोरडे
जून १० १५
जुलै १० २१
ऑगस्ट ४ २८
पर्जन्यमान : अपेक्षित ४५१.५९, प्रत्यक्षात २६०.४२ म्हणजे ५७.६७ टक्के पाऊस
९७.६७ टक्के खरीप पेरणी पूर्ण

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी
औरंगाबाद ७३२८४६ ६८९०६० ९४.०३ पेरणी
जालना ५८७२५७ ५९४४५४.४ १०१.२
बीड ७६३७८२ ७५१७३८ ९८.४२
एकूण २०,८३,८८५ २०,३५,२५२ ९७.६७
 

७०.२० टक्केच पर्जन्यमान
मराठवाड्यात १ जून ते ९ सप्टेंबरपर्यंत दरम्यान ५९३.१७ मिमीच्या तुलनेत ४१६.४१ मिमी म्हणजे ७०.२० टक्के पर्जन्यमान झाले आहे. बीड सर्वांत कमी ५५.५८ टक्के, उस्मानाबाद ६२.२१, लातूर ६९.७३, नांदेड ८३.१९, हिंगोली ६५.८६, परभणी ७१.४२, औरंगाबाद ८०.६१ टक्के पाऊस पडला .

बातम्या आणखी आहेत...