आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : शेतकरी पेन्शन योजनेत ९४ लाख शेतकरी पात्र; ३० लाख ९८७ खात्यांवर पहिला हप्ता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर  - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ९४ लाख ६६ हजार ९१७ शेतकरी कुटुुंबे पात्र ठरली आहेत. यापैकी ९२ लाख ९० हजार ६० शेतकरी कुटुंबाची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५ लाख ५४ हजार ६६६ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. यामध्ये ३० लाख ९८७ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर पहिला हप्ता तर १५ लाख ५३ हजार ६६६ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा झाला आहे. ४ लाख ६२ हजार ४८६ शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये त्रुटी राहिल्याने पैसे जमा झाले नाहीत. 
पंतप्रधान शेतकरी पेन्शन याेजनेंतर्गत केंद्र सरकारकडून मदत म्हणून प्रती वर्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रूपये जमा करण्यात येणार आहे. याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील ४५ लाख ५४ हजार ६६६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पात्र शेतकरी कुटुंबाचे ९८ टक्के नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आले असून काही शेतकऱ्यांच्या नावे, बँक खाते यामध्ये त्रुटी निघाल्याने खात्यावर रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याचे काम प्रशासनस्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. १५ ऑगस्टपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.   झाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्याने पैसे जमा करण्यात येणार आहेत.

 


१५ जिल्ह्याची १००%माहिती अपलोड : सातारा, पालघर, हिंगोली, कोल्हापूर, यवतमाळ, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर, रायगड, वाशिम, बुलढाणा, पुणे, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग तसेच सांगली या १५ जिल्ह्यातील १०० टक्के पात्र कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. अमरावती, गोंदिया, जालना, धुळे व चंद्रपूर जिल्ह्यातील ९९ टक्के लाभार्थ्यांची नावे अपलोड झाली आहेत. तर बीड, गडचिरोली ९९ टक्के, भंडारा अहमदनगर, औरंगाबाद ९८ टक्के, वर्धा, लातूर, नागपूर ९६ टक्के, नंदुरबार, नांदेड, परभरणी ९४ टक्के तर नाशिक व जळगाव या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ९० टक्के नावे अपलोड केली आहेत.

 

औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता
अहमदनगर ९५,६९०, अकोला ६४०५४, अमरावती ५२,६८४, औरंगाबाद १,९९,५९७, बीड १,६७,७७७, भंडारा ४१,६८६, बुलढाणा १,२२,८०५, चंद्रपूर ६१,४९९, धुळे ६२,८९४, गडचिरोली ४२,७५६, गोंदिया ७१,२०५, हिंगोली ४५,९३५,जळगाव ८१,८४२, जालना ८७,३३४, कोल्हापूर १,२९,०९७, लातूर १,५४,६७१, मुंबई २२७, नागपूर ५६,३३१,नांदेड १,७३,३३१, नंदुरबार ४६,१४४, नाशिक १,८४,५३७, उस्मानाबाद ८९,१९०, पालघर ४३,६६०, परभणी ७२,७५२, पुणे ८७,५४२,  सोलापूर १,५३,८१३, ठाणे १७,८८४, वर्धा ५६,८०१, वाशिम ६८,३१० आणि यवतमाळ जिल्ह्यात ५९,३२० शेतकरी कुटुंबास पहिला हप्ता मिळाला आहे.