आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : अॅमेझॉनवरून दुबईहून घरपाेच गर्भपाताची औषधेे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी कायद्यानुसार खुल्या विक्रीला बंदी असलेले गर्भपाताचे औषध अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळाने नाशकात घरपोच पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला. डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्सशिवाय अशा प्रकारची औषध विक्री करता येत नसतानाही अशी अनेक औषधे थेट घरपाेच मिळू लागल्याने समाजाचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबद्दल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असाेसिएशनने संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांना नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने गर्भपाताच्या या औषधांच्या बिलासह निवेदन देत ऑनलाइन फार्मसीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संघटनेचे पदाधिकारी योगेश कदम यांनी ॲमेझॉनवरून ऑनलाइन गर्भपाताच्या औषधांची ऑर्डर दिली. त्यानुसार त्यांना उत्तर प्रदेशातील दुबई या गावातून नाशकात गर्भपाताचे औषध घरपोच प्राप्तही झाले. त्याबद्दल संतापलेल्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने अन्न प्रशासन विभागाकडे धाव घेतली.  संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण भारतातील औषधे विक्रेत्यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाशी संघटनेने पत्रव्यवहार केले. परंतु ऑनलाइन फार्मसीमार्फत सर्रास गर्भपाताची व नशेची औषधे सहज उपलब्ध होत आहेत. ऑनलाइन अनधिकृत औषधे खरेदी -विक्री ही समाजाच्या दृष्टीने हिताची नसून त्यामुळे होणारे दुरुपयोग, दुष्परिणाम टाळण्यासाठी अशा ऑनलाइन संकेतस्थळावर त्वरित कारवाई केली जावी. 

अनधिकृत औषधी देणाऱ्या मेडिकलवर कारवाई
अशाच एका प्रकरणात चार महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये एका मेडिकलने नियमित औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय दिल्याचे उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्यांचा परवाना रद्द केला हाेता. मात्र, आता अॅमेझॉनवर कशा प्रकारे कारवाई केली जाते याची प्रतीक्षा असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
 

सायबर क्राइमकडे तक्रार करून कारवाई करणार
ही तक्रार आल्यानंतर आम्ही तत्काळ उत्तर प्रदेश ड्रग कंट्राेलरला याची माहिती दिली आहे. आॅॅनलाइन व्यवहार हे इलेक्ट्राॅनिक डॉक्युमेंट असल्याने व त्याची चाैकशी सायबर सेलकडून करावी लागणार आहे. त्यानंतर आम्हीही कारवाई करू.
-दुष्यंत भामरे, सहआयुक्त, अन्न व आैषध प्रशासन 
 

बातम्या आणखी आहेत...